नाशिक : अकरावी प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच दहावीच्या फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी यासाठी शिक्षण विभागातर्फे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार राबविण्यात येणाºया दुसºया फेरीत प्रवेश घेण्याची बुधवारी (दि. १२) अखेरची संधी आहे.आतापर्यंत प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत प्रवेशप्रक्रियेचे भाग एक भरून त्याची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.दहावीच्या फेरपरीक्षेतील विद्यार्थ्यांसह अजूनही अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी बुधवारी प्रवेश घेण्याची अखेरची संधी आहे. त्यामुळे संबधित विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरातील मार्गदर्शन केंद्रावर संपर्क साधून प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शहरातील व्ही. एन. नाईक महाविद्यालय, भोसला महाविद्यालय, पंचवटी महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन मिळणार आहे. तर सिडकोतील के. एस. डब्ल्यू. महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र असून, विद्यार्थ्यांना याठिकाणी प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन मिळणार आहे. नाशिकरोड परिसरातील बिटको महाविद्यालयातील मार्गदर्शन केंद्रावर जाऊन प्रवेशप्रक्रिया पूर्ण करू शकतील.
अकरावी वंचित विद्यार्थ्यांना आज अखेरची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 1:42 AM