नाशिक : व्हॅलेंटाइन डे अर्थात प्रेमाच्या उत्सवासाठी गुलाबाची फुले, आकर्षक स्वादातले चॉकलेट, कॅडबरीसह गोड पदार्थ, ग्रिटिंग्ज, भेटवस्तू, हॉटेल्स, पर्यटनस्थळे, चित्रपटगृहे आदी साºयांची सज्जता झाली आहे. प्रेमदिनासाठी शहरातील बाजारपेठा विविध भेटवस्तूंनी फुलल्या असून, आपल्या प्रियजनांबरोबरचा दिवस यादगार करण्यासाठी प्रेमीजन विशेषत: तरुणाई सज्ज झाली आहे.प्रेमाची कुबली देण्याचा, प्रेम व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस म्हणून व्हॅलेंटाइन डे साजरा केला जाणार असून, तो निरनिराळ्या प्रकारे साजरा करण्याचे नियोजन पहायला मिळत आहे. कुणी जवळपासच्या पर्यटनस्थळी जाण्याच्या विचारात आहेत, तर कुणी दिवसभर सिनेमा, हॉटेलिंग, शॉपिंग, गप्पा-टप्पा असा दिवसभर मौजमजा करण्याचा विचार करत आहे. आपल्या प्रिय व्यक्तींना द्यावयाचे गिफ्ट, फुले यांची आगाऊ खरेदीही करून झाली आहे. आपल्या प्रिय व्यक्तीला दिलेले शुभेच्छापत्र जपून ठेवले जात असल्याने आणि हवे तेव्हा ते काढून पाहता येत असल्याने, त्यातील मजकूर प्रभावी ठरत असल्याने अनेकांनी हिंदी, मराठी, इंग्रजी भाषेतील लहान-मोठ्या आकाराची शुभेच्छापत्रे खरेदी केली. तसेच आवडते पोस्टर्स, फ्रेम, टेडीबिअरसारखे सॉफ्टटॉइज, पर्सनलाइज गिफ्ट यांचीही खरेदी जोरात होती. गेल्या काही वर्षांपासून ‘व्हॅलेंटाइन डे’ला होणारा विरोध मावळला असून, केवळ खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त असल्याने हा दिवस शांततेत साजरा होताना दिसत आहे. आपल्या प्रियजनांना प्रेमाची भेटवस्तू देण्यासाठी त्याची आगाऊ खरेदी करण्यावर बाजारपेठेत भर पहायला मिळालाच, पण हा दिवस संस्मरणीय करण्यासाठी विविध हॉटेल्स, रिसॉर्ट, पर्यटनस्थळे, सिनेमागृहे आदी ठिकाणच्या पिकनिकचे प्लॅन आणि त्यासाठी गाडी, खाद्यपदार्थांची सिद्धता आदींचे नियोजन करण्यात आले आहे.
आज व्हॅलेंटाइन डे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 1:05 AM
नाशिक : व्हॅलेंटाइन डे अर्थात प्रेमाच्या उत्सवासाठी गुलाबाची फुले, आकर्षक स्वादातले चॉकलेट, कॅडबरीसह गोड पदार्थ, ग्रिटिंग्ज, भेटवस्तू, हॉटेल्स, पर्यटनस्थळे, चित्रपटगृहे आदी साºयांची सज्जता झाली आहे. प्रेमदिनासाठी शहरातील बाजारपेठा विविध भेटवस्तूंनी फुलल्या असून, आपल्या प्रियजनांबरोबरचा दिवस यादगार करण्यासाठी प्रेमीजन विशेषत: तरुणाई सज्ज झाली आहे.
ठळक मुद्देतरुणाई सज्ज गिफ्ट, फुले, पार्टी सबकुछ...