मुखेड : येथे शुक्रवारपासून (दि.२३) येथे भवानी मातेच्या यात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. येथील प्रसिद्ध असलेल्या भवानी माता मंदिरात शुक्रवार ते रविवारपर्यंत तीन दिवसीय यात्रेस आरंभ होत आहे. यात प्रामुख्याने कुस्त्यांची दंगल महत्त्वाची मानली जाते . या यात्रोत्सवात शनिवार दि.२४ व रविवार दि.२५ मार्च रोजी सायंकाळी कुस्त्यांची दंगल रंगणार आहे. या यात्रोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भवानी माता मंदिर ट्रस्टकडून करण्यात आले आहे. भवानी मातेच्या यात्रोत्सवास पुरातन परंपरा आहे. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात तीनही दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात्रेच्या पहिल्या दिवशी लोकनाट्याचा कार्यक्रम ठेवला जातो. कुस्त्यांची दंगल आयोजित केली जाते. पहिलवानांना भरघोस मानधनाचे वाटप केले जाते. जिल्हाभरातून भाविक या यात्रोत्सवात सहभागी होऊन भवानीमातेचे दर्शन घेऊन कृतार्थ होतात. यात्रोत्सव यशस्वी होण्यासाठी छगन आहेर, दिलीप आहेर, रघुनाथ पानसरे, विजय आहेर, विजय जाधव, राजू कदम, रावसाहेब आहेर आदी प्रयत्नशील आहेत.
मुखेड येथे आज कुस्त्यांची दंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:06 PM