शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
4
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
5
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
6
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
7
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
8
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
9
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
10
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
11
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
12
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
13
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
14
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
16
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
17
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
18
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
19
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
20
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा

लाभार्थ्यांकडून शौचालयांची मागणी

By admin | Published: May 08, 2017 1:40 AM

नाशिक : नव्याने केलेल्या सर्वेक्षणात आणखी ४६९४ लाभार्थ्यांनी शौचालयांची मागणी केली असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिली

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने शहरात पहिल्या टप्प्यात ६४४६ लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालयांचा लाभ पुरविल्यानंतर एप्रिल महिन्यात पुन्हा नव्याने केलेल्या सर्वेक्षणात आणखी ४६९४ लाभार्थ्यांनी शौचालयांची मागणी केली असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिली. दरम्यान, महापालिकेकडे सदर अभियानांतर्गत मिळालेल्या अनुदानातील तीन कोटी ३८ लाख रुपयांचा निधी शिल्लक असून, त्यातून नवीन लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वाटप करण्याचा विचार असल्याचेही बोर्डे यांनी स्पष्ट केले.केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेने आतापर्यंत ६४४६ वैयक्तिक शौचालयांची उभारणी केलेली आहे. महापालिकेला स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) राबविण्यासाठी आतापर्यंत दहा कोटी ४१ लाख ३९ हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. प्राप्त अनुदानापैकी वैयक्तिक शौचालय लाभार्थ्याला ७ कोटी ८५ लाख ४ हजारांचा निधी वाटप झालेला आहे, तर ३ कोटी ३८ लाख १८ हजार रुपयांचा निधी शिल्लक आहे. याशिवाय, वैयक्तिक शौचालयासाठी लाभार्थ्यांच्या खात्यावर दुसरा हप्ता १ कोटी ६० लाख ६२ हजार रुपये वर्ग करण्याची कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत महापालिकेने ६४४६ वैयक्तिक शौचालयांची उभारणी करत पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट पूर्ण केले आहे. शिलकी निधीतून आणखी काही शौचालयांची उभारणी करण्यासाठी महापालिकेने एप्रिल महिन्यात सहाही विभागांत नव्याने सर्वेक्षण केले. त्यात ४६९४ लाभार्थ्यांनी वैयक्तिक शौचालयांची मागणी केलेली आहे. त्यानुसार, महापालिकेने कृती आराखडा तयार केला असून, सरकारकडून आणखी निधीची मागणी करण्यात आलेली असल्याचेही किशोर बोर्डे यांनी स्पष्ट केले.