शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

देवीभक्तांकडून दहा रुपयांचा वाहनतळ ‘टोल’

By admin | Published: December 15, 2015 10:55 PM

सीईओंचे आदेश : ग्रामपंचायतीकडून मागविला अहवाल

नाशिक : येवला तालुक्यातील कोटमगावच्या देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना सरसकट दहा रुपयांचा वाहनतळ ‘कर’ आकारणाऱ्या कोटमगाव ग्रामपंचायतीकडून यासंदर्भात अहवाल मागविण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.कोटमगाव ग्रामपंचायतीने गेल्या दोन आठवड्यांपासून कोटमगाव देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी दहा रुपये वाहनतळ कर आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. वस्तुत: असा निर्णय घेण्याआधी संबंधित ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मान्यता घेणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र कोटमगाव ग्रामपंचायतीने परवानगी न घेताच ही दहा रुपये कर आकारणी सुरू केल्यानंतर त्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या. मंगळवारी (दि.१५) यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांना बोलावून संबंधित ग्रामपंचायतीने याबाबत नेमकी काय कार्यवाही केली आहे? याबाबतचा तातडीने अहवाल मागवावा, असे आदेश दिले. जिल्हा परिषद सदस्य कृष्णराव उर्फ बाळासाहेब गुंड यांनी संबंधित ग्रामपंचायतीने अशी कर आकारणी केली होती, मात्र आता ही कर आकारणी बंद करण्यात आल्याचे सांगितले. विशेष म्हणजे मागील दोन स्थायी समिती सभांमधून सप्तशृंग गड ग्रामपंचायतीने येणाऱ्या भाविकांवर आधी सरसकट दोन रुपये व नंतर ही दरवाढ फेटाळल्यानंतर येणाऱ्या भाविकांच्या वाहनावर १५ ते २० रुपये कर आकारणीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर तो फेटाळण्यात आला आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेची मान्यता न घेताच सरसकट वाहनतळाची कर आकारणी करणाऱ्या ग्रामपंचायतीवर आता कोणती कारवाई करते, याकडे जिल्हा परिषद सदस्यांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)