पिंपळगाव बसवंत : सरकारने जी टोल नाके बंद करण्याची घोषणा केली आहे, ती टोल कामगारांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे शासनाच्या निषेधार्थ येत्या बुधवारी (दि.३१) देशातील सर्वच टोल नाका कामगारांनी काळ्या फिती बांधून शासनाच्या त्या निर्णयाचा निषेध नोंदवावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य टोल कामगार संघटनाचे अध्यक्ष पांडुरंग भडांगे यांनी केले आहे.सरकार पुढील एका वर्षात देशातील सर्व टोल प्लाजा बंद करण्याच्या योजनेवर काम करीत आहेत. टोल बंद करण्याचा अर्थ टोल प्लाजा बंद करण्याशी संबंधित आहे. आणि सरकार अशा तांत्रिक गोष्टींवर काम करीत आहे, मात्र यामुळे लाखो कामगारांवर उपासमारीची वेळ येणार असल्याने महाराष्ट्र राज्य टोल संघटनेच्या वतीने येत्या ३१ मार्च रोजी संपुर्ण भारतभर सरकारच्या निर्णयाविरोधात टोल नाक्यावर सर्व कामगार बांधवानी शांततेत दिवसभर काळ्या फिती बांधून काम करावे व आंदोलनाची तीव्रता वाढवुन शासनाचा निषेध नोंदवावा असे आवाहन संघटनेच्या वतीने पांडुरंग भडांगे, सरचिटणीस डॉ. अजय लोढा, कार्याध्यक्ष रामेश्वर भावसार, पिंपळगाव कामगार युनिट अध्यक्ष बाळासाहेब पठाडे, सहसचिव सुधीर डांगळे यांनी केले आहे.
टोल नाके बंदच्या शासन निर्णयावर टोल कर्मचाऱ्यांचे ३१ ला आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 7:02 PM
पिंपळगाव बसवंत : सरकारने जी टोल नाके बंद करण्याची घोषणा केली आहे, ती टोल कामगारांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे शासनाच्या निषेधार्थ येत्या बुधवारी (दि.३१) देशातील सर्वच टोल नाका कामगारांनी काळ्या फिती बांधून शासनाच्या त्या निर्णयाचा निषेध नोंदवावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य टोल कामगार संघटनाचे अध्यक्ष पांडुरंग भडांगे यांनी केले आहे.
ठळक मुद्देकामगारांनी काळ्या फिती बांधून शासनाच्या त्या निर्णयाचा निषेध नोंदवावा