राजापूर (ता. येवला) : जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून टमाट्याच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत असून सध्या एक ते दोन रुपये किलो भाव मिळत आहे. यामुळे वाहतूक तसेच मजुरीचा खर्चही खिशातून करावा लागत असल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली जात आहे.येवला तालुक्यातील राजापूर येथे मागील वर्षी टमाट्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकºयांनी यंदा टमाट्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली. मात्र यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने लागवड केलेल्या पिकासाठी पाणी विकत घ्यावे लागले. मात्र पिक बाजारात आले अन भाव कोसळले. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.टमाट्यासाठी एकरी एक लाख ते सव्वालाख रु पये खर्च करून हातात एक रु पयाही पडत नाही. उलट काढणी आणि वाहतुकीसाठी घरातून पैसे घालण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे.
टमाटा १ रुपया किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 6:45 PM
जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून टमाट्याच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत असून सध्या एक ते दोन रुपये किलो भाव मिळत आहे. यामुळे वाहतूक तसेच मजुरीचा खर्चही खिशातून करावा लागत असल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली जात आहे.
ठळक मुद्देभाव कोसळल्याने उत्पादक हवालदिल