जळगाव नेऊर : द्राक्षबाग पावसामुळे वाया गेली. म्हणून टोमॅटो लगवड केली पण , टोमॅटोला भाव फक्त तीन रूपये किलो प्रमाणे भाव मिळाल्याने त्यातुन खर्चही फिटेनासा झाल्याने शेतकऱ्यांना टोमॅटो जनावरांना घालण्याची वेळ आली आहे. गारपीट व बेमोसमी पावसाने उद्धवस्त झालेल्या पिंपरी ता.येवला येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी भगवान ठोंबरे यांनी द्राक्ष बाग काढून टोमॅटो पिकाची लागवड केली. पण टोमॅटोतून खर्चही फिटनेसा झाल्याने शेतकºयांनी टोमॅटो मार्केटऐवजी जनावरांना घालण्याची वेळ आली आहे. या शेतकºयांनी चालू परिस्थितीत टोमॅटो तोडण्यासाठी पेठ, सुरगाणा येथून मजुर आणले आहेत .त्याची मजुरी वीस रु पये कॅरेटप्रमाणे गाडी ,भाडे , टोमॅटो लागवडीसाठी झालेल्या खर्च जमीन तयार करणे आठ हजार रु पये, बेड करणे तीन हजार रु पये, मल्चिंग पेपर २५ हजार रूपये , मल्चिंग पेपर ठोकणे मजुरी पाच हजार रु पये, नर्सरी मधुन टोमॅटो रोपे घेणे १५ हजार रु पये, रोपे लावणे पाच हजार रु पये, मजुरी टोमॅटो साठी लगणारे खते शेणखत दोन ट्रँक्टर दहा हजार रु पये, डोस १५ हजार रु पये, टोमॅटो बाधने मजुरी व सुताळी ६० हजार रु पये, उन्हाळ्यात टोमॅटो असल्यामुळे उन्हापासुन संरक्षण होण्यासाठी मालेगाव येथुन २० हजार रु पये कपडा, टोमॅटो औषध खर्च ७० हजार रु पये झाले आहे. एकुन लागवडीसाठी क्षेत्र १०० गुंट्यासाठी सर्व खर्च २,३६ हजार रूपये खर्च झाला, मात्र यातून खर्चही निघेनासा झाल्याने शेतकºयांवर आर्थिक संकट ओढावले आहे.
भावच नसल्याने टोमॅटो जनावरांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 4:15 PM