सिन्नर: सिन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली (सावतामाळीनगर) उपबाजार आवारात टोमॅटो खरेदी विक्रीचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती विनायक तांबे यांच्या हस्ते करण्यात आला.पहिल्याच दिवशी सुमारे 4000 जाळ्यांची आवक झाली. टोमॅटो या शेतमालास कमाल रू.550/- तर सरासरी रू.350/- प्रती जाळी याप्रमाणे विक्रमी भाव मिळाला.यावेळी बाजार समितीचे संचालक संजय खैरनार, माजी उपसभापती उत्तम माळी (कानडे), विष्णुपंत ढोकणे, कारभारी हारक, निवृत्ती हारक, हिरामन मंडलीक, योगेश बोर्हाडे आदी उपस्थित होते.पहिल्या दिवशी परिसरातील विष्णुपंत हारक, भाऊसाहेब चव्हाणके, निवृत्ती हारक, आंबादास लहाणे, राजाराम हारक, ज्ञानेश्वर मंडलीक, नितीन भोर, युवराज भोर, कैलास वाजे, संतु पवार, सिताराम शेळके, रतन लहाणे, बाळु दळवी, नवनाथ पाडेकर, राजु परदेशी, संपत भांगरे, विलास वाजे, प्रल्हाद हगवणे, कैलास दळवी, बाळासाहेब पवार आदी शेतकर्यांनी टोमॅटो शेतमाल विक्रीसाठी आणला. टोमॅटो खरेदीसाठी आर. के. बागवान, लक्ष्मी ट्रेडींग कपनी, प्रभाकर हारक, निवृत्ती चव्हाणके, बाळासाहेब दळवी, रईस पटेल, एफ. एम. ट्रेडर्स, शालीमार ट्रेडर्स, एस. एस. बागवान, श्री गणेश ट्रेडींग कंपनी, जोशी ट्रेडर्स, के. एस. बी. कंपनी, नाना खरात, फिरोज शेख, मे. एन. जी. एस. कंपनी, जब्बारभाई शेख, बापुशेठ डांगे, आल्मभाई शेख दिल्ली एक्सपोर्ट, शाकीर युसुब शेख,अन्सारभाई शेख, मे.एन.बी.एस.कंपनी, आतीफभाई शेख, मे. बी. आर. टी. कंपनी, प्रमोदशेठ यादव, अनिलशेठ हारक, साईबाबा व्हीजीटेबल कं. हरीयाणा, न्यु मिलन व्हीजीटेबल कंपनी येवलावाले आदींनी लिलावात सहभागी होवून टोमॅटो शेतमाल खरेदी केला.बाजार समितीच्या वतीने आलेल्या प्रत्येक व्यक्तीस सॅनीटायझरचा वापर करण्यात येत होता. तसेच कोविड-19 या रोगाचा प्रतिबंध करणेसाठी उपाययोजना म्हणुन नाका तोंडाला मास्क लावणे, सोशलडिस्टंसींग ठेवणे, बाजार आवारात विनाकारण गर्दी टाळणे इत्यादी सुचना लाऊडस्पिकर वरुन वारंवार करण्यात आल्या. पांढुर्ली परिसरातील टोमॅटो उत्पादक शेतकर्यांनी आपला टोमॅटो शेतमाल पांढुर्ली उपबाजार येथे दररोज दुपारी दोन वाजता विक्रीसाठी आणावा असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले. टोमॅटो खरेदी-विक्रीचे कामकाज सुयोग्य पध्दतीने होण्यासाठी बाजार समितीचे सचिव विजय विखे, उपसचिव राजेंद्र जाधव, इन्चार्ज रंगनाथ डगळे, निरीक्षक सोमनाथ चव्हाणके, रोहित उगले, अर्जुन भांगरे, एस.के.पवार आदींसह बाजार समितीच्या कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.