लोकमत न्यूज नेटवर्कउमराणे : येथील स्व. निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारपासून (दि.२५) टमाटा लिलाव सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक सुजेय पोटे यांनी दिली.उमराणे येथे कांद्याची बाजारपेठ असल्याने येथे डाळिंब व भाजीपाला लिलावही सुरू करण्यात यावा, अशी मागणी उमराणेसह परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. त्या अनुषंगाने महिन्यापूर्वी डाळिंब लिलाव सुरू करण्यात आले. त्यापाठोपाठ आता भाजीपाला लिलावही सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बाजार समिती प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.प्रायोगिक तत्त्वावर सर्वप्रथम टमाटा लिलाव मंगळवारी दुपारी १२ वाजता सुरू करण्यात येणार आहे. टमाटा उत्पादक शेतकऱ्यांनी प्रतवारी करून माल विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव नितीन जाधव व सहायक सचिव तुषार गायकवाड यांनी केले आहे.
उमराणे बाजार समितीत आजपासून टमाटा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 10:52 PM
उमराणे : येथील स्व. निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारपासून (दि.२५) टमाटा लिलाव सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक सुजेय पोटे यांनी दिली.
ठळक मुद्दे डाळिंब व भाजीपाला लिलावही सुरू करण्यात यावा, अशी मागणी