ओझर : नाशिक जिल्ह्यातील खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून नावारूपाला आलेल्या टमाट्याचा हंगाम संकटात सापडला असून ओझर ते सुकेणे पट्टयातील जवळपास संपूर्ण पीक वाया जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालिदल झाला आहे. टमाट्याच्या भावात सातत्याने होणारी घसरण यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांवर टमाटा अक्षरश: रस्त्यावर टाकून देण्याची वेळ आली आहे.नाशिक जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून जून ते आॅक्टोबर महिन्यात टमाट्याचे पीक घेतले जाते. मागील वर्षी याच हंगामात टमाट्याला ३०० ते ४०० रूपये प्रति २० किलो क्रटला भाव मिळाला होता. शेतक-यांना त्यातून चांगली कमाईही झाली होती. मात्र, यंदा हंगामाच्या सुरूवातीलाच प्रति क्रट ३० ते ४० रूपये असल्याने खर्च निघत नसल्याने शेतक-यांनी टमाट्याची तोडणीच बंद केली आहे. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दररोज दीड ते दोन लाख क्रट टमाटे विक्रसाठी येतात. थोडया दिवसात हि संख्या तीन लाखावर जाण्याची शक्यता आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी आवक यामुळे बाजार भावावर त्याचा परिणाम होत असल्याने भाव सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात वाढणार नाही, असे व्यापारी सांगत आहेत. तर जून-जुलै महिन्यात लागवड केलेले टमाटे कवडीमोल भावात विक्री करावी लागणार असल्याची भीती शेतक-यांकडून व्यक्त केली जात आहेआवक वाढल्याने परिणामयंदा राज्यात बहुतांशी भागात समाधानकारक पाऊस पडल्याने आणि वातावरण पोषक असल्याने टमाट्याचे पीक भरघोस आले आहे. त्यामुळे आवक मोठया प्रमाणात आहे. नाशिक जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील माल विक्रसाठी उपलब्ध होत आहे. इतर राज्यात चांगला पाऊस पडल्याने टमट्याचे भरघोस पीक आल्याने प्रचंड आवक आहे मात्र त्या तुलनेत खरेदी करणा-या व्यापा-यांची संख्या कमी आहे. खरेदी होत नसल्याने शेतक-यांचा माल बाजार समितीच्या आवारात पडून रहात आहे.
नाशिक जिल्ह्यात टमाट्याचा हंगाम संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 4:00 PM
भावात घसरण : ओझर-सुकेणे पट्टयाला मोठा फटका
ठळक मुद्देखर्च निघत नसल्याने शेतक-यांनी टमाट्याची तोडणीच बंद केली आहे