वणी : समाधानकारक पाऊस व अनुकूल वातावरणामुळे टमाटा लागवडीस वेग आला असून, निर्यातक्षम टमाटा लागवडीस उत्पादक अग्रक्र म देत आहेत. द्राक्ष, ऊस, कांदा, टमाटा असे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेणाऱ्या दिंडोरी तालुक्यात सध्या टमाटा लागवडीची लगबग सुरू आहे. पारंपरिक पद्धत सोडून आधुनिक पद्धतीने लागवडी करण्यास शेतकरी अग्रक्र म देताना दिसत आहे. एक एकर शेती क्षेत्रात अंदाजे सहा हजार रोपांची लागवड करण्यात येते. ट्रॅक्टरच्या साह्याने तीन फूट रूंदीचा ओरंबा (बेड) पाडून पाण्यासाठी ड्रीपचे पाइप पसरविण्यात येतात. तद्नंतर बेसलडोस (खते) टाकून त्यावर मलचिंग पेपरला रोपांच्या लागवडीनुसार कापून त्यावर पसरविण्यात येता,े अशी माहिती टमाटा उत्पादक यांनी दिली. एकरी सुमारे दहा हजार रु पये किमतीचा ३० मायक्र ॉन जाडीचा आयात केलेला मलचिंग पेपर आच्छादित केल्याने अतिवृष्टीचा प्रतिकूल परिणाम होत नाही. झाडावर अतिरिक्त पाणी थांबत नाही. निंदणी करण्याची आवश्यकता राहत नाही. त्यामुळे बचत होते. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये खत स्वरुपातील द्रवपदार्थ झाडांच्या मुळाशी टाकणे सोपे जाते. दरम्यान एकरी लागवड ते उत्पादनाचा खर्च ५० हजारांच्या जवळपास येतो. लागवडीनंतर एक महिन्याच्या कालावधीनंतर रोपांच्या दोन्ही बाजूस बांबू रोवण्याची प्रक्रि या करावी लागते रोपांची उंची ५ ते ६ फूट वाढल्यावर बांबूंना तारा बांधून रोपांना सुतळीच्या साह्याने तारांना बांधण्यात येते. लागवडीनंतर दोन महिन्यांनी उत्पादन सुरू होते, असे एका शेतकºयाने सांगितले.
टमाटा लागवडीस वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 6:26 PM