पिंपळगाव बसवंत : येथील बाजार समितीत शुक्रवारी टमाट्याला किलोमागे केवळ दोन रुपयाचा भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी टमाटा रस्त्यावरच फेकून दिला. उत्पादन खर्च अन् भाड्याचे व मजुरीचेही पैसे मिळाले नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रति २० किलोला अवघे २० रु पये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांवर कांद्यापाठोपाठ आता मोठे संकट उभे राहिले आहे. टमाट्याच्या एक एकर लागवडीसाठी नऊ हजार रुपयांचे बियाणे, रासायनिक खते, एक क्विंटल तार, बांबू, झाडे, औषधे फवारणी, बांधण्यासाठी सुतळी, मजुरी असा एकंदरीत नव्वद हजार रुपयांचा जवळपास सर्व खर्च येतो. हातात काहीच मिळाले नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.(वार्ताहर)घोटी : गेल्या दोन वर्षांपासून पाण्याअभावी नुकसान होणाऱ्या भात पिकाला ऐन कापणीच्या वेळी होत असलेल्या अवकाळी पावसामुळे फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस होऊनही परतीच्या पावसात ओंब्यावर आलेले भातपीक नुकसानीच्या संकटात सापडले असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.गेल्या काही वर्षांपासून इगतपुरी तालुक्यात समाधानकारक पाऊन होत नसल्याने कधी लागवडीच्या वेळी पावसाची प्रतीक्षा तर कधी खते मारण्यासाठी वाट पाहावी लागत होती. भाताची लागवड करण्यासाठी आणि भातपिके जगविण्यासाठी विहिरीतून, नदीनाल्यांमधून इंजिनाच्या साहाय्याने पाणी भरून भातपीक जगवत होते.ऐन बहरात आलेल्या भातावर निसर्ग अवकृपा करीत अवकाळीच्या रूपाने मोठे नुकसान करीत आहे. मात्र यावर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने भाताची लागवड सुलभपणे झाली आहे. पावसाच्या सातत्य मुळे भात पिके हि तालुक्यात उत्तम आली आहेत.यातील हाळी समजल्या जाणार्या भाताला ओंब्या येण्यास सुरु वात झाली आहे.मात्र तरीही पावसाने उसंत न घेतल्याने पिकावर आलेल्या या भात पिकाला हा पाऊस हानिकारक समजला जातो.यामुळे परतीचा पाऊस तालुक्यातील शेतकर्यांना डोकेदुखी देणारा ठरणार आहे.यामुळे शेतकर्यांनी नुकसानीची धास्ती घेतली आहे.----------------कशी होते नुकसानअंत्यंत अल्प दिवसात व मुबलक उत्पन्न असणारे हळी वाणाचे पीक तालुक्यातील माळराणावर मोठ्या प्रमाणात घेतले जाते.या वाणाला कमी पावसाची आण िपाण्याची आवश्यकता असते.सद्या हे पीक ओंब्यावर आले आहे.या ओंब्या कोवळ्या असल्याने यात पाणी शिरले तर आतील तांदूळ पपरिपक्व होत नाही.परिणामी पीक नष्ट होऊन उत्पादनात लक्षणीय घट होते.याकरिता पावसाने काही दिवस उसंत देणे आवश्यक असते.
टमाटा फेकला रस्त्यावर...
By admin | Published: September 24, 2016 12:26 AM