नाशिक - जिल्ह्यातील चांदवड, पिंपळगाव, वणीसह जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये टमाट्यास सरासरी २ ते ४ रुपये भाव मिळाला. चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी टमाट्याचे बाजारभाव अवघे चार रुपये किलोवर आल्याने शेतकरी हैराण झाले. गत सप्ताहात टमाट्याचे बाजारभाव कोसळले होते. तेव्हा टमाटा प्रतिकॅरेटला पन्नास रुपये (२० किलोचे कॅरेट) असे भाव असताना या सोमवारी मात्र १११ रुपये जास्तीत जास्त, तर कमीत कमी ८५ रुपये प्रतिकॅरेट भाव होता. त्यामुळे चार रुपये किलोप्रमाणे बाजारभाव होते. दरम्यान, कालच्या आठवडे बाजारात किरकोळ हातविक्रीसाठी टमाटा ८ ते १० रुपये प्रतिकिलो भाव होता.
नाशिक जिल्ह्यात टमाटा भावात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 4:55 PM