संजय पाठक, नाशिक- शेतमालाच्या किमतीतील घसरण कायम असून नाशिक मध्ये आज कांद्या पाठोपाठ टोमॅटोचे भाव कोसळल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सायंकाळी बाजार समितीच्या आवारात आणलेला टोमॅटो रस्त्यावरच ओतून दिला.
आज सायंकाळी बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या टोमॅटोला दोन ते अडीच रुपये किलो इतका भाव मिळाला. वाहतूक खर्च तर निघाला नाहीच शिवाय टोमॅटो परत नेणे परवडणारे नसल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी आणलेला माल रस्त्यावर टाकून दिला आणि राज्य सरकारचा निषेधही केला नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सायंकाळी शेतमाल येतो आणि तो मुंबईच्या वाशी मार्केटसह विविध राज्यांमध्ये पाठवला जातो.