वणी : अतिवृष्टीच्या तडाख्याने हैराण व हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतक-यांना आता टमाट्याचा आधार आहे. वणी सापुतारा रस्त्यावरील बाजारसमीतीच्या उपबाजारात व खोरीफाटा भागात टमाटा खरेदी विक्र ी केन्द्र सुरु झाले आहे. सद्यस्थितीत सुमारे ५० हजार क्विंटल आवक टमाट्याची होत आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान येथील व्यापारी टमाटा खरेदीचे व्यवहार करत आहेत. प्रतिदिवशी सुमारे २५ ट्रक टमाटा परराज्यात विक्र ीसाठी जात आहे, अशी माहिती टमाटा व्यापारी संजय उंबरे यांनी दिली. यानिमित्ताने मोठी आर्थिक उलाढाल होते आहे. टमाटा खरेदी विक्री व्यवहार प्रणालीमुळे वणी सापुतारा रस्त्याला यात्रेचे स्वरु प आले आहे. ट्रॅक्टर, पिकअप जीप, छोटा हत्ती अशा विविध वाहनांची वर्दळ वाढली आहे. दरम्यान सद्यस्थितीत टमाट्याला मिळणाºया भावामुळे उत्पादकांना काही अंशी आर्थिक दिलासा मिळाला आहे.दिंडोरी तालुक्यात परतीच्या पावसामुळे विविध पिकांची वाताहात झाली आहे. नुकसानीचे पंचनामे भरपाईची मागणी याबाबतीत सर्वच स्तरावरु न पाठपुरावा सुरु आहे. तालुक्यातील द्राक्षबागाचे सुमारे पन्नास टक्के नुकसान झाले आहे. भात, नागली वरई ही पिकेही धोक्यात आली आहेत. टमाटा पिकाचेही नुकसान झाले आहे. मात्र तुलनात्मक कमी असले तरी सध्या टमाट्याला बºयापैकी भाव असल्याने टमाटा उत्पादकांना तेवढाच आधार आता उरला आहे. सुमारे दोनशे ते चारशे पन्नास असा दर प्रतवारी व दर्जानुसार उत्पादकांना मिळतो आहे. दिंडोरीतालुक्यात टमाट्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. पावसामुळे नुकसान झाल्यानंतर दुबार लागवड करण्यात आली होती. पावसाच्या तडाख्यात काही उत्पादकांचे नुकसान झाले मात्र तरीही अशा प्रसंगाला सामोरे जाऊन बहुतांशी उत्पादकांनी हे पिक जगविण्यासाठी आर्थिक अतिरिक्त भार सोसला आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना टमाट्याचा आधार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 1:16 PM