लासलगाव : सध्या टोमॅटोचा दर फारच कमी झाला आहे. पाकिस्तानने भारताकडून शेतमाल आयातबंदीचा निर्णय घेतल्याने त्याचा थेट फटका लासलगावच्या टोमॅटोला बसला आहे. टोमॅटोचे दर मध्यंतरी एक हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते; मात्र टोमॅटोची निर्यात पूर्णपणे बंद झाल्याने तोच टोमॅटो आज दोनशे रु पये भावाने विक्री होत आहे. म्हणजेच शेतकºयांच्या हाती प्रतिकिलो दोन ते दहा रु पये इतकेच मोल पडत आहे.लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आॅगस्ट महिन्यात टोमॅटोची ७६९४५ क्र ेट्स इतकी आवक झाली होती. या टोमॅटोला कमीत कमी ५१ रु पये, जास्तीत जास्त एक हजार रुपये तर सरासरी सातशे रुपयांपर्यंत भाव मिळाले होते. सप्टेंबर महिन्यात ३३१३२६ क्र ेट्स एवढी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक लासलगाव बाजार समितीत झाली होती; मात्र आॅगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोच्या दरात घसरण पाहायला मिळाली. टोमॅटोचे दर जास्तीत जास्त ४२१ इतके तर सरासरी केवळ २०० रुपये इतका दर टोमॅटोला मिळाल्याने शेतकºयांच्या पदरी मोठी निराशा पडली आहे. सर्वात जास्त शेतमालाची आयात करणाºया पाकिस्तानने आज भारताकडून कुठलाही शेतमाल न घेण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानची बॉर्डर लासलगावच्या टोमॅटोसाठीही बंद पडली आहे, त्यामुळे त्याचा थेट फटका टोमॅटोच्या भावावर झाला आहे. हजार रुपयांचा टोमॅटो आज कवडीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. मध्य प्रदेश, रतलाम, शिवपुरी या ठिकाणी स्थानिक मालाचे आगमन झाल्याने तेथेही नाशिक जिल्ह्यातील टोमॅटोला मागणी नाही. अशा परिस्थितीत वातावरणात दररोज मोठे बदल होत असल्याने टोमॅटो पाणी सोडत आहे. आपल्याकडे कांद्याचे दर वाढले की भारत सरकारकडून कांदा पाकिस्तानातून आयात केला जातो; मात्र आज टोमॅटोच्या बाबतीत ही वेळ आल्याने सरकार टोमॅटोचे दर वाढण्यासाठी पाकिस्तानची बॉर्डर खुली करणार का असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. ााकिस्तान बॉर्डर खुली झाली तर शेतकर्यांच्या हाती चार पैसे मिळतील व शेतकरयांचे नुकसान टळेल त्यामुळे भारत सरकारच्या निर्णयाकडे टोमॅटो उत्पादक लक्ष लावून आहेत .
टमाटे दोन रुपये किलो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 11:40 PM