चार रुपये किलो : दर घसरल्याने शेतकरी हवालदिल
सायखेडा : काबाडकष्ट करून तयार केलेल्या टमाट्याला केवळ चार रुपये किलो भावाने म्हणजेच २० किलोचे क्रेट ८० रुपये किलोने विकले जाऊ लागल्याने शेतकºयांमध्ये नाराजी पसरली असून, गेल्या चार दिवसातील भावातील ही नीचांकी घसरण आहे.आठ ते दहा दिवसांपूर्वी प्रतिक्रेट पाचशे ते सहाशे रु पये असलेले टमाटे आता किमान ऐंशी रुपये प्रतिक्रेट विक्री करावे लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसाळी टमाटे उत्पादनात नाशिक जिल्हा अव्वल आहे. पावसाळ्यातील सर्वाधिक चांगल्या दर्जाचे टमाट्याचे उत्पादन जिल्ह्यात होत असल्याने पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाट्याची आवक सर्वाधिक असते. दररोज मोठी आवक होत असते. पिंपळगाव बाजार समितीतून मंगळवारी दोन लाख ११ हजार ७३ क्रेट आवक झाल्याने जवळपास दिवसाला २०० ते २२५ गाड्या टमाटे निर्यात होतात. पाकिस्तानात सर्वाधिक टमाटे निर्यात होत असतात; मात्र पाकिस्तानात माल निर्यात होत नसल्याने मागणीपेक्षा पुरवठा अधिक प्रमाणात झाला आहे. बांगलादेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भागात टमाटे जात असले तरी नवरात्र उत्सव आणि स्थानिक टमाटे तेथील बाजारपेठेत आल्याने मागणी कमी झाली आहे. पर्यायाने येथील आवक जैसे थे असल्याने कमी दराने व्यापारी टमाटे खरेदी करत आहे. त्यामुळे ऐन सुगीच्या दिवसात शेतकºयांना चार पैसे मिळतील अशी आशा अखेर खोटी ठरली आहे.जून महिन्यात पाणी कमीअसते. त्यामुळे मिल्चिंग पेपर पसरवून टमाटे लागवड केली जाते, रोपे, ड्रीप आणि सेंद्रीय आणि रासायनिकखते तसेच बदलत्या हवामानानुसार येत असलेले विविध प्रकारचे रोग आटोक्यात आणण्यासाठीकीटक-नाशकांची फवारणी, जमिनीची मशागत, तारी, बांबू, सुतळी, मजुरी, वाहतूक असा मोठा खर्च अगोदर करावा लागतो. एकरी दीड लाख रुपये खर्च करून पीक हाती येते; मात्र शासनाचे निर्यात धोरण आणि बदलते वातावरण यामुळे टमाटे पीक शेतकº्याने स्वत: खर्च केलेले पैसेदेखील मिळवून देतनाही. जिल्ह्यातील सर्वात जास्त टमाटे पाकिस्तानमध्ये निर्यात होतात. निर्यात खुली असली तर निश्चित चांगले दर मिळतात. निर्यातक्षम टमाटे चांगल्या भावात विकले तर लोकल प्रतीचे टमाटे विक्री होतात; मात्र सरकारचे धोरण आणि पाकिस्तानशी वाद नेहमीच टमाटे उत्पादक शेतकरी यांच्या मुळावर उठतो, काबाड कष्ट करून पिकवलेला माल आज शेतकºयांना रडवतो आहे.राज्यातून पिंपळगाव बाजार समितीमधून दररोज अडीच लाख क्रेटच्या आसपास टमाटे निर्यात होतात. शेतकºयांना चार पैसे मिळण्याची वेळ येते आणि सरकारी निर्यात धोरण, पाकिस्तानात जाणाºया मालावर निर्यातबंदीघालण्यात येते त्यामुळे भावाची घसरण होते सध्या अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे आणि बांगलादेशात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भागात टमाटे जात आहे. मात्र नवरात्र उत्सव आणि स्थानिक टमाटे तेथील बाजारपेठेत आल्याने मागणी कमी झाली आहे. त्यामुळे भावाने नीचांक पातळी गाठली आहे.- गोकुळ गिते, संचालक, पिंपळगाव बाजार समितीटमाटे पिकाकडे प्रमुख नगदी पीक म्हणून पाहिले जात आहे. रासायनिक खते, कीटकनाशक, मिल्चिंग पेपर, तारी, बांबू, मशागत यासाठी एकरी दीड लाख रु पये खर्च करून पीक सांभाळले. पीक जोमात आले टमाटे बाजारात विक्रीसाठी आणले आणि भाव घासल्याने खर्च वसूल होणार नाही ऐंशी रुपये क्रेट विकले गेल्याने खर्च कसा वसूल होणार? त्यामुळे योग्य ते धोरण निश्चित करणे आवश्यक आहे.- अनिल कोकाटे, शेतकरी