नाशिक : रमजान पर्वाचा २९वा उपवास (रोजा) शनिवारी (दि. २३) पुर्ण झाला. संध्याकाळी चंद्रदर्शनाची शक्यता वर्तविली जात होती; मात्र आकाश स्वच्छ व निरभ्र असूनही चंद्रदर्शन कोठेही घडले नाही. यामुळे रमजान पर्वचे ३० उपवास पुर्ण करून सोमवारी (दि.२५) रमजान ईदचा सण साजरा करण्याचा निर्णय शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांनी शनिवारी शाही मशिदीत झालेल्या बैठकीत घेतला.यावर्षी संपुर्ण रमजान पर्व कोरोनाच्या सावटाखाली पार पडले. रमजान ईदवरही कोरोनाचे सावट कायम असून लॉकडाउन येत्या ३१ तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे खतीब यांनी जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या सुचनेप्रमाणे यंदा ईदनिमित्त ईदगाहवर होणारा सामुदायिक नमाजपठणाचा सोहळा पुर्णपणे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे सोमवारी नमाजपठण नागरिकांनी आपआपल्या घरांमध्येच करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. नागरिकांनी कोठेही सामुहिकरित्या एकत्र येऊन ईदची नमाज अदा करू नये, असे खतीब यांनी म्हटले आहे.चंद्रदर्शन शनिवारी घडले नाही. यामुळे यावर्षी रमजान पर्वच ३० उपवास पुर्ण होत आहे. रविवारी संध्याकाळी रमजान पर्वाची सांगता होऊन पुढील उर्दू महिना सुरू होईल. त्यामुळे सोमवारी सकाळी रमजान ईद साजरी केली जाणार आहे. नागरिकांनी आपआपल्या घरात नमाजपठण करावे व फातीहा पठण करून कुटुंबियांसोबत ईदचा आनंद लुटावा. यावर्षी ईदच्या शुभेच्छा देताना कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अधिक खबरदारी घेत हस्तांदोलन व अलिंगण टाळावे, असेही आवाहन धर्मगुरूंनी केले आहे.
सोमवारी रमजान ईद : ईदगाहवर सामुदायिक नमाजपठण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 8:12 PM
नाशिक : रमजान पर्वाचा २९वा उपवास (रोजा) शनिवारी (दि. २३) पुर्ण झाला. संध्याकाळी चंद्रदर्शनाची शक्यता वर्तविली जात होती; मात्र ...
ठळक मुद्देचंद्रदर्शन घडले नाही रविवारी होणार ३० उपवास पुर्ण