शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मशाल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 11:06 PM

पिंपळगाव बसवंत : भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद सिंह यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात येतो त्या निमित्ताने खुल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात

पिंपळगाव बसवंत : भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद सिंह यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात येतो त्या निमित्ताने खुल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.पिंपळगाव हायस्कूल येथे रविवारी (दि.२९) सकाळी ९ वाजता कुस्तीपटू रवींद्र मोरे यांच्या हस्ते निफाड फाटा परिसरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मशाल रॅली काढण्यात आली आणि मेजर ध्यानचंद अमर रहेच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, संजय पाटील, अनिल जाधव, पिंपळगावचे सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, एनसीसी अधिकारी नितीन डोखळे, क्रीडाशिक्षक रामराव बनकर आदी मान्यवर तर पिंपळगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक मोरे हे अध्यक्षस्थानी होते.गेल्या दोन-अडीच वर्षांपासून खेळाडू व शाळेतील विद्यार्थी मैदानी खेळापासून दुरावले आहेत; मात्र या मुलांची ओढ मैदानी खेळाकडे टिकून राहावी आणि क्रीडा संस्कृती वाढावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच कानाकोपऱ्यात खेळाची जागरुकता निर्माण व्हावी यासाठी पिंपळगावी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला.या जिल्हा खुल्या स्पर्धेत ८० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यात म्युझिकल चेअर व स्केटिंग चेअर स्पर्धेत ८ वर्षांखालील मुलींच्या गटात आरुषी भोसले-प्रथम, स्नेहल गणेश शेवरे-द्वितीय, स्वराली गोसावी-तृतीय. तर मुलांच्या गटात वेदांत डेरे-प्रथम, बजीवन जाधव-द्वितीय,अभिषेक डेरे-तृतीय विजेते ठरले.१७ वर्षांखाली मुले गटात विनायक जाधव-प्रथम, आर्यन मोरे-द्वितीय, स्वरूप आथरे-तृतीय, मुली गटात खुशी इखांकर-प्रथम, लेण्याद्री आहिरराव-द्वितीय, अदिती वणवे-तृतीय.१८ वर्षांपुढील मुले गटात शुभम जाधव-प्रथम, ऋषिकेश उगले-द्वितीय, मुली गटात तेजश्री निकम-प्रथम, नम्रता खैरनार-द्वितीय, शुभाश्री आढाव-तृतीय.१४ वर्षांखालील मुलांमध्ये आरुष भोसले-प्रथम, साईल वनसे-द्वितीय, हेमंत सैदाने-तृतीय, मुलींमध्ये अनवी कोकाटे-प्रथम, पालख देवरे-द्वितीय, खुशी बोरसे-तृतीय.१४ वर्षांपुढील मुले गटात यश लभडे-प्रथम, धृप भागवत-द्वितीय, सिदेश आहिरे-तृतीय, मुलींच्या गटात स्वराली गोसावी आदी विद्यार्थ्यांनी पारितोषिके मिळविली. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडा भारती नाशिक व क्रीडा भारती निफाड, निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी पिंपळगाव हायस्कुल, मास्टर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ मार्शल आर्टचे प्रशिक्षक योगेश जठार, योगेश देशमुख, मोसीम मणियार, अमोल पवार, सचिन सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मोते यांनी तर आभार क्रीडाशिक्षक अमोल पवार यांनी मानले. 

टॅग्स :SchoolशाळाSocialसामाजिक