संततधार पावसाने नद्या-नाल्यांना पूर आल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. अनेक फरशी पुलावरून पाणी वाहत असल्याने गावांचा संपर्क तुटला. बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत असल्याने व्यावसायिकांनी सकाळपासूनच दुकाने बंद ठेवणे पसंत केले. तालुक्यातील छोटेमोठे धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून नद्यांमधून विसर्ग होत आहे.
--------------------------
सावळघाटात ट्रक-पिकअप धडकली
बुधवारी सकाळपासून संततधार पाऊस व प्रचंड धुके असल्याने सावळघाटात एका वळणावर ट्रेलर व पिकअपचा अपघात झाला. यामध्ये पिकअप रस्त्याच्या कडेला जवळपास ५० फूट घसरत गेली. तर ट्रेलर रस्त्यावर आडवा झाल्याने संततधार पावसात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
----------------------------------
1) पेठ तालुक्यात संततधार पावसाने नद्यांना आलेला पूर.
2) सावळघाटात कंटेनर व पिकअपच्या अपघातात वाहनांचे झालेले नुकसान. (२२ पेठ रेन १/२)
220921\22nsk_6_22092021_13.jpg~220921\22nsk_7_22092021_13.jpg
२२ पेठ रेन १~२२ पेठ रेन २