नाशिक : शहर व परिसरात सोमवारी (दि. २१) सकाळपासूनच ढगाळ हवामान होते. तसेच उकाडाही जाणवत होता. दुपारी १ वाजेच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारा नसला तरी दुपारी २ वाजेपर्यंत शहरासह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस झाला. दिवसभरात २0.५ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली.हवामान खात्याने मध्य-उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मंगळवारीसुद्धा जोरदार पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. सोमवारी दुपारी केवळ तासभर पाऊस झाला; मात्र पावसाचा जोर खूप अधिक होता. त्यामुळे परिसरातील रस्ते जलमय झाले होते. मोकळ्या भूखंडांना तलावाचे स्वरूप आले होते. जनजीवनावर मोठा प्रभाव पडला. पावसाला सुरुवात होताच विविध भागांमधील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले.भगूर, देवळाली, नाशिकरोड भागात मुसळधार पावसाला दुपारी १२ वाजेपासून सुरुवात झाली होती. त्यानंतर पंचवटी, म्हसरूळ, मेरी, उपनगर,जुने नाशिक, सातपूर भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली.गंगापूर धरण १00 टक्के भरलेनाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण आता पूर्णपणे १०० टक्के भरले आहे. गंगापूर धरण समूहाच्या परिसरात पावसाची विश्रांती कायम आहे. सोमवारी गंगापूर धरण समूह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या त्यामुळे नव्याने पूर्णपणे धरणात फारसे आले नाही परिणामी सोमवारी उशिरापर्यंत कुठल्याही प्रकारे पाण्याचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आलेला नव्हता. सध्या गंगापूर धरण संवाद पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गंगापूर धरणातून विसर्गाची तयारी जलसंपदा खात्याकडून करण्यात आलेली नाही, मात्र गंगापूर धरण समूहात पावसाचा जोर वाढल्यास धरणातून कधीही विसर्ग केला जाऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे गोदावरीच्या काठालगत जिल्हा प्रशासनाकडून सतकर्तेचा इशारा देण्यात आला आहे.
...तासभर मुसळ‘धार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 1:24 AM
शहर व परिसरात सोमवारी (दि. २१) सकाळपासूनच ढगाळ हवामान होते. तसेच उकाडाही जाणवत होता. दुपारी १ वाजेच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारा नसला तरी दुपारी २ वाजेपर्यंत शहरासह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस झाला. दिवसभरात २0.५ मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली.
ठळक मुद्दे२0.५ मिमीपर्यंत नोंद : शहर परिसर जलमय; विजेचा खोळंबा