शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

इकडे छळवणूक, तिकडे हप्तावसुली

By विजय मोरे | Published: November 17, 2018 1:09 AM

पेशाने शिक्षक, मूळचा पालघर जिल्ह्णातील मोखाडा तालुक्यातील रहिवासी, गत चार वर्षांपासून विनावेतन विद्यादानाचे कार्य करणारा़ दिवाळीनिमित्त सासूरवाडीला गेल्यानंतर तिथे सासऱ्यांच्या हॉटेलवर पोलिसांकडून सुरू असलेली हप्ता-वसुली त्याच्या शिक्षकी मनाला रुजली नाही़ त्याने या हप्ता वसुलीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले अन् पोलिसांचा चेहरा समोर आणला़ मात्र, भ्रष्टाचारा-विरोधात लढणाºया या शिक्षकावर पोलिसांबाबत तक्रार करतो या कारणावरून त्र्यंबकेश्वर पोलिसांनी छळवणूक केलीच आता एकीकडे पोलीस अन् दुसरीकडे हप्तावसुली करणारे गुंड यांच्या कात्रीत या शिक्षकाचे कुटुंबीय सापडले असून, पीडित शिक्षकाने विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवदेन दिले आहे़

ठळक मुद्दे‘त्या’ तक्रारदाराची व्यथा : एसीबी अन् पोलिसांकडून असुरक्षित असल्याचा दावा

नाशिक : पेशाने शिक्षक, मूळचा पालघर जिल्ह्णातील मोखाडा तालुक्यातील रहिवासी, गत चार वर्षांपासून विनावेतन विद्यादानाचे कार्य करणारा़ दिवाळीनिमित्त सासूरवाडीला गेल्यानंतर तिथे सासऱ्यांच्या हॉटेलवर पोलिसांकडून सुरू असलेली हप्ता-वसुली त्याच्या शिक्षकी मनाला रुजली नाही़ त्याने या हप्ता वसुलीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले अन् पोलिसांचा चेहरा समोर आणला़ मात्र, भ्रष्टाचारा-विरोधात लढणाºया या शिक्षकावर पोलिसांबाबत तक्रार करतो या कारणावरून त्र्यंबकेश्वर पोलिसांनी छळवणूक केलीच आता एकीकडे पोलीस अन् दुसरीकडे हप्तावसुली करणारे गुंड यांच्या कात्रीत या शिक्षकाचे कुटुंबीय सापडले असून, पीडित शिक्षकाने विशेष पोलीस महानिरीक्षकांना निवदेन दिले आहे़संत आईसाहेब महाराज इंग्लिश स्कूल, पळसे येथील शिक्षक गणेश गोंदके यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर हप्तेखोर पोलीस कर्मचारी व अधिकाºयांमुळे ही कठीण वेळ आली आहे़ गोंदके यांचा दोष इतकाच की त्यांना भ्रष्टाचार बघविला गेला नाही आणि त्यांनी त्याचा जिवंत पुरावा तयार करून वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी तसेच दोषींना शिक्षा व्हावी यासाठी तो सोशल मीडियावर व्हायरल केला़ त्यांनी केवळ पोलिसांचेच नाही तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचेही पुरावे जमा केले आहेत़ या पुराव्यांमुळेच उत्पादन शुल्कच्या निरीक्षकाने त्यांच्या सासूबार्इंना मारहाण करण्यात केली़ या मारहाणीची तक्रार त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांत दोनवेळा दिली़पोलीस उपअधीक्षकाच्या नावाने हप्तावसुली करणाºया विलास पाटील या कर्मचाºयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकाºयाच्या वाहनावरील कर्मचारी वायकांडेचाही व्हिडीओ व्हायरल केला़ यानंतर सासºयांसोबत संबंधित पोलीस कर्मचाºयावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जाऊन पुरावेही दिले़ यानंतर सासूच्या मारहाणीबाबत दिलेल्या तक्रारीवरील कारवाईबाबत चौकशी करण्यासाठी गेलेल्या शिक्षक गोंदके याच्यावर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी धमकावणीची भाषा वापरून पोलिसाची तक्रार करतो का? तुला दाखवितोच पोलीस काय असतो असे म्हणून तब्बल पाच तास डांबून ठेवत छळ केला़, असे पीडिताने नमूद केले आहे. सोशल मीडियावर गोंदके यांनी व्हिडीओ व्हायरल केल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित हप्तेखोर पोलीस कर्मचारी व अधिकाºयांचे धाबे दणाणले़ त्यांनी गुंड तसेच पोलीस बळाचा वापर करून धमकावण्याचा प्रकार सुरू केला आहे़ यामुळे गोंदके यांची पत्नी व लहान मुलाला अक्षरश: भूमिगत करावे लागले आहे़ विशेष म्हणजे पोलिसांनी तू शिकविण्याचे काम कर, तुला कायदा कळत नाही आम्ही दाखवतो तुला कायदा काय असतो ते असे म्हणून त्र्यंबकेश्वरचे एपीआय बेंडाळे याने वरिष्ठांना फोन लावून मानसिक त्रास दिला़ तसेच नोकरी घालविण्याची धमकीही दिल्याचे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी