नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २१) नवीन ९५५ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण २३९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अडीचपट असली तरी जिल्ह्यात ४६ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४२८० वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात कोरोनामुक्त नागरिकांची संख्या सातत्याने बाधितांच्या तुलनेत अधिक रहात आहे. त्यामुळेच शुक्रवारी एकूण उपचारार्थी रुग्णांच्या संख्येत अजून घट होऊन ही संख्या १६२२१ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ४६८, तर नाशिक ग्रामीणला ४६५ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात २२ रुग्ण बाधित आहेत, तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात २५, ग्रामीणला २१ असा एकूण ४६ जणांचा बळी गेला आहे.
इन्फो
उपचारार्थी १६ हजारांवर
जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या सातत्याने अधिक राहात असल्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या १६२२१ वर पोहोचली आहे. त्यात ५८९१ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, ९२६० रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, १०७० मालेगाव मनपा क्षेत्रातील रुग्णांचा समावेश आहे.
इन्फो
कोरोनामुक्तचे प्रमाण ९४ टक्क्यांवर
जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ होऊन ते प्रमाण ९४.५७ टक्क्यांवर पाेहाेचली आहे. त्यात जिल्हाबाह्य रुग्णांचा दर ९८.०५ टक्के, नाशिक शहर ९६.४९, नाशिक ग्रामीण ९१.९२, तर मालेगाव मनपाचा कोरोनामुक्तीचा दर ८८.८२ टक्क्यांवर पाेहोचला आहे.