नाशिक : दोन दिवस झालेल्या गारपिटीच्या अस्मानी संकटामुळे जिल्'ातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून पडले असताना, त्यांना तत्काळ आर्थिक मदत मिळण्यासाठी सर्वप्रथम आवश्यक असलेली नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यांची कारवाई पुढाऱ्यांच्या नुकसानग्रस्त भागातील एकाच दिवसातील अनेक दौऱ्यांमुळे थंड बस्त्यात बांधली गेल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटण्याची चिन्हे आहेत. त्यातच अमुक एका नुकसानग्रस्त भागातच का पाहणी करता म्हणून चक्क शिरवाडे वणी येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून सहकारमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफाच अडविला. या रास्ता रोकोचे नेतृत्व माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल व उत्तम भालेराव यांनी केले. या रास्ता रोकोत संयमाचा बांध फुटलेल्या काही शेतकऱ्यांनी चक्क राज्यमंत्री दादा भुसेंच्या दिशेने नुकसान झालेली द्राक्ष फेकल्याचे समजते. त्यामुळेच संताप अनावर झालेल्या राज्यमंत्र्यांनी मग चिडून जाऊन सकाळपासून मीच शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी दौरे करीत आहे. तुम्हाला असाच पावित्रा घ्यायचा असेल तर मी परत फिरतो, असे सांगताच शेतकऱ्यांनी मग त्यांना वडनेरभैरव (ता. चांदवड) येथील नुकसानीची पाहणी करण्याची केली. त्यानंतर भुसे यांनी वडनेरभैरव येथील दोन शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांची पाहणी करून नंतर निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट दिली.
दौरे उदंड जाहले, रखडले नुकसानीचे पंचनामे कृषी अधिकाऱ्यांची कसरत : राज्यमंत्र्यांवर द्राक्ष‘फेक’
By admin | Published: December 14, 2014 1:52 AM