शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

पर्यटनपूरक व्यवसायाला अर्थसहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:26 AM

सुशिक्षित बेरोजगार असलेल्या तरुणांना पर्यटन व्यवसायात रोजगाराला वाव आहे. ट्रॅव्हल्स व्यवसाय हा पर्यटनाला पूरक असा असून, या व्यवसायासाठी सरकारच्या वतीने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून इच्छुकांना अर्थसहाय्यही उपलब्ध असल्याचे प्रतिपादन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुनील काचे यांनी केले.

नाशिक : सुशिक्षित बेरोजगार असलेल्या तरुणांना पर्यटन व्यवसायात रोजगाराला वाव आहे. ट्रॅव्हल्स व्यवसाय हा पर्यटनाला पूरक असा असून, या व्यवसायासाठी सरकारच्या वतीने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून इच्छुकांना अर्थसहाय्यही उपलब्ध असल्याचे प्रतिपादन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुनील काचे यांनी केले.जागतिक पर्यटन दिनानिमित्त ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन आॅफ नाशिक व ईजी सोल्युशन अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यटन : विकास व संधी’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (दि.२७) मखमलाबाद रस्त्यावरील ग्रीन लॅन्ड रिसॉर्ट येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी पाहुणे म्हणून व्यासपीठावर पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे, महाराष्टÑ कौशल्य व उद्योजकता विकास संचलनालयाचे उपसंचालक सुनील सैंदाणे, सारंगखेड्याचे सरपंच जयपाल रावल उपस्थित होते.  यावेळी काचे म्हणाले, राज्य शासनाच्या विविध महामंडळांच्या माध्यमातून गरजू प्रशिक्षणार्थ्यांना तसेच व्यवसाय इच्छेुकांना शासकीय क र्ज सुविधा उपलब्ध आहेत. याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, कर्ज प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले. लाभार्थ्यांना ५० हजारापासून तर पाच लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकते. याकरिता प्रकल्प अहवाल, व्यावसायिकता, प्रामाणिकपणा, जिद्द-चिकाटी आदिंची गरज असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, मुंडावरे यांनी राज्य पर्यटन महामंडळाकडून राज्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. ‘तान’चे दत्ता भालेराव यांनी ‘नाशिक : कृषी पर्यटनाच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना पर्यटन अभ्यासक्रम, व्यक्तिमत्त्व विकास, संभाषण कौशल्य, पर्यटनाचे धडे देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरुणाईला योग्य दिशा दाखविल्यास बेरोजगारीला आळा बसेल, असे प्रशिक्षक सागर धर्माधिकारी यांनी सांगितले. जयेश तळेगावकर यांनी वाइन पर्यटन याविषयी माहिती दिली.पर्यटनमित्रांचा गौरवपर्यटनवृद्धीसाठी प्रयत्न करून योगदान देणाºया पर्यटनमित्रांचा गौरव महाराष्टÑ राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) वतीने करण्यात आला. यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन पर्यटनमित्रांना गौरविण्यात आले. यावेळी पर्यटन क्षेत्रात सिनिक, वाइन, टुरिझम, टेंट, डॅम, आर्ट, फूड, धार्मिक आदी पर्यटनाच्या माध्यमातून प्रयत्नशील असणाºया व्यक्ती व संस्थांची निवड करण्यात आली होती. यावेळी रॅम विजेते सायकलपटू डॉ. महेंद्र महाजन, डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. रमाकांत पाटील, डॉ. राजेंद्र नेहेते, मनोज वासवानी, सागर वाघचौरे, विनायक पाटील, संजय खताळे, विजयालक्ष्मी शंकर आदिंना गौरविण्यात आले.मोफत पर्यटन प्रशिक्षणकौशल्य भारत विकास अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मागील महिन्यापासून शहरातील रविवार कारंजा येथे सदर अकादमीत मोफत पर्यटन प्रशिक्षण दिले जात आहे. एकूण तीस विद्यार्थी येथे प्रशिक्षण घेत असून पुढील बॅचसाठी नाव नोंदणीही सुरू आहे. किमान बारावी उत्तीर्ण असलेल्या समाजातील सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रशिक्षणासाठी वयोमर्यादेची अट नसून कालावधी सहा महिन्यांचा आहे.