शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

पर्यटकांनी गजबजले नांदूरमधमेश्वर

By admin | Published: November 14, 2015 11:31 PM

सुटीचे दिवस : परराज्यातील हौशी-अभ्यासू पक्षिप्रेमींचीही निरीक्षणासाठी हजेरी

नाशिक : हिवाळ्याला झालेला प्रारंभ अन् चालू आठवड्यात दीपावलीनिमित्त आलेल्या सलग सुट्यांमुळे नागरिकांनी नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्याला भेट देण्याला अधिक पसंती देत आहे. नाशिकसह राज्यभरातून दोन दिवसांमध्ये पर्यटक नांदूरमधमेश्वरमध्ये दाखल होत आहे. यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत पक्षी अभयारण्यामधील निरीक्षण मनोऱ्यांवर हौशी-अभ्यासू पक्षिप्रेमींची झुंबड पहावयास मिळत आहे.राष्ट्रीय अभयारण्याचा दर्जा प्राप्त झालेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर धरणाच्या पाणथळ जागेवर दरवर्षी हिवाळ्याची चाहूल लागताच शेकडो ते हजारो देशी व विदेशी स्थलांतरित पक्षी भूक भागविण्यासाठी येतात. सध्या नांदूरमधमेश्वरला वीस ते तीस प्रकारचे देशी-विदेशी पक्ष्यांचे थवे पहावयास मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने पाणकोंबडी, बदक यांचा समावेश असून, थापट्या बदक, तरंग, भुवई बदक, चक्रवाक (ब्राह्मणी), गढवाल, तलवार बदक, नकटा बदक, जांभळा बगळा, राखाडी बगळा, लाल सरी बदक, हळदी-कुंक, मराल, टिबुकुली बदक, रंगीत करकोचा, उघड्या चोचीचा करकोचा, मोर शराटी, पांढरा शराटी, चमचा बगळा, मालगुजा, कमळ, दलदल ससाणा, टिबकेदार गरुड, कापसी ससाणा, सर्प गरुड यांसारख्या शिकारी पक्ष्यांचेही या ठिकाणी दर्शन घडते. त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. (प्रतिनिधी)