नगरसूल : येवला तालुक्यातील नगरसूल येथील दादमळा प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना सकाळी अल्पोपाहाराच्यावेळी देण्यात आलेल्या दूध आणि खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना शनिवारी (दि.६) घडली. मुलांना उलट्या होऊ लागल्याने पालकांनी त्यांना तातडीने नगरसूल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, २२ विद्यार्थ्यांना विषबाधेचा त्रास झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.नेहमीप्रमाणे दादमळा शाळेत मुलांना दुध व खिचडी देण्यात आली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी दूध घेण्यास नापसंती दर्शविली होती. परंतु, काही विद्यार्थ्यांनी दूध व नंतर खिचडी घेतल्याने काही तासातच मुलांना शाळा उलट्या सुरू झाल्या. त्यामुळे मुले घाबरून गेली. या घटनेमुळे पालकांचीही एकच तारांबळ उडाली आणि मुलांना नगरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरु वातीला विषबाधा झालेल्या एक-दोन विद्यार्थ्यांची संख्या संध्याकाळपर्यंत बावीसवर जाऊन पोहोचली. विद्यार्थ्यांवर नगरसूल ग्रामीण रु ग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. डी. सूर्यवंशी, एस.आर. कांबळे, आरोग्य सेवक एन.डी. तिरसे यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून, ज्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली त्यांना घरी पाठविण्यात येत आहे. दरम्यान, सदर घटना घडताच जिल्हा परिषद सदस्या सविता पवार, बाळासाहेब पवार, कांतिलाल साळवे, सरपंच प्रसाद पाटील, ग्रामविकास अधिकारी गोरख निकम, उमेश देशमुख आदींनी रुग्णालयात भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली तर रु ग्णालय प्रशासनाने येवला तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे...या विद्यार्थ्यांना झाली विषबाधाअमृता पैठणकर, निखिल पैठणकर, तनुषा घाडगे, राहुल कोल्हे, पूनम पैठणकर, पवन पैठणकर, अमृता मोरे, राधा मोरे, सार्थक जाधव, वर्षा पैठणकर, कृष्णा पैठणकर, सोनाली पवार, जिजाबाई गायकवाड, एकनाथ गायकवाड, अंकिता पैठणकर, कैलास जाधव, आकाश जाधव, साहेबराव पवार, ईश्वर पवार या आठ ते दहा वयोगटातील बावीस मुलांना विषबाधा झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.ग्रामीण रु ग्णालयात उपचारासाठी दाखल विद्यार्थ्यांची संख्या बावीस झाली असून, सुरुवातीला मुलांना होत असलेल्या उलट्या व दिसणाऱ्या लक्षणावरून विषबाधा झाल्याचे निदर्शनात आले आहे. विषबाधा दुधासारख्या पदार्थातून झाली आहे. आता मुलांची प्रकृती स्थिर आहे.-डॉ. एस. डी. सूर्यवंशी, वैद्यकीय अधीक्षकप्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया अल्पोपाहारात अंडी, दूध हे बंद करण्यात यावे. त्यात गुणवत्ता राहत नाही. याऐवजी बिस्कीटे देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. याबाबत आम्ही प्रशासनाला त्याबाबत विनंती केली आहे.- विजय पोपट पैठणकर, पालक
नगरसूलला विद्यार्थ्यांना दुधातून विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 1:03 AM
नगरसूल : येवला तालुक्यातील नगरसूल येथील दादमळा प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना सकाळी अल्पोपाहाराच्यावेळी देण्यात आलेल्या दूध आणि खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना शनिवारी (दि.६) घडली. मुलांना उलट्या होऊ लागल्याने पालकांनी त्यांना तातडीने नगरसूल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, २२ विद्यार्थ्यांना विषबाधेचा त्रास झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ठळक मुद्देदादमळा शाळेतील प्रकार । ग्रामीण रुग्णालयात उपचार