सिन्नर : सिन्नर - शिर्डी महामार्गावरील खोपडी शिवारातील दत्त मंदिराजवळ इट्रिका कारने टॅक्टरला शनिवारी (दि.१७) दुपारी दोन वाजेच्या सुमारास जोरदार धडक दिली. या अपघातात टॅक्टरचालक मोतीराम लक्ष्मण दराडे (५५ , खोपडी ) जागीच ठार झाले तर इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. दराडे ट्रॅक्टर (एमएच १५, जीएफ ३६७४) घेऊन परिसरात कांदे भरण्यासाठी जात होते. त्याचसुमारास भिंवडी येथील ज्ञानेश्वर गोविंद पवार (५५) व नमिता ज्ञानेश्वर पवार (४९) हे पती-पत्नी इट्रिका कारने (एमएच ४८, एस ४७८७) शिर्डीहून घरी परतत होते. खोपडी शिवारातील दत्त मंदिर परिसरात ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने इट्रिका कारने टॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेत टॅक्टर पलटी झाला. पलटी टॅक्टरखाली सापडून दराडे यांचा जागेवरच मृत्यु झाला. तर पवार पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत वावी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. पोलीस हवालदार एस.व्ही. शिंदे, एम.के. चव्हाण अधिक तपास करीत आहेत़
खोपडी शिवारात कारची ट्रॅक्टरला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:47 AM
सिन्नर : सिन्नर - शिर्डी महामार्गावरील खोपडी शिवारातील दत्त मंदिराजवळ इट्रिका कारने टॅक्टरला शनिवारी (दि.१७) दुपारी दोन वाजेच्या सुमारास जोरदार धडक दिली. या अपघातात टॅक्टरचालक मोतीराम लक्ष्मण दराडे (५५ , खोपडी ) जागीच ठार झाले तर इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले.
ठळक मुद्देएक ठार, दोन जखमी टॅक्टरचालक मोतीराम लक्ष्मण दराडे (५५ , खोपडी ) जागीच ठार