वीरगाव : येथूनच जवळ असलेल्या कान्हेरी नदीच्या पुलावरून कांद्याने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह नदीपात्रात पलटी झाल्याने यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून, त्यास मालेगाव येथील खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले.एकावर सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केले जात असून, हे दोन्हीही बागलाण तालुक्यातील डोंगरेज येथील रहिवासी आहेत. डोंगरेज येथील उत्तम ग्यानदेव खैरनार आपल्या मालकीच्या ट्रॅक्टरमधून गुरुवारी सटाणा येथील बाजार समितीत कांदा विक्र ीसाठी जात होते. मात्र घरापासून काही अंतरावरच बिघाड होऊन ट्रॅक्टर बंद पडल्याने खैरनार यांनी गावातील दुसरा ट्रॅक्टर आणून नादुरुस्त ट्रॅक्टर याच अवस्थेत सटाणा शहराकडे ओढून नेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान ट्रॅक्टर पात्रात फेकले गेले. अपघातानंतर वीरगाव येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातातील गोरख पवार व दादाजी दुबळा सोनवणे यांना रुग्णालयात दाखल केले. डोंगरेज व वीरगावच्या मध्यभागी असलेल्या कान्हेरी नदीजवळील तीव्र उतारावर नादुरु स्त ट्रॅक्टरचे ब्रेक निकामी झाल्यामुळे दोन्ही ट्रॅक्टर कांद्याने भरलेली ट्रॉलीसह नदीपात्रात फेकले गेले. यात दोन्हीही ट्रॅक्टरचे चालक गंभीर जखमी झाले, तर ट्राली यात पलटी होऊन कांदा नदीपात्रातफेकला गेला.
ट्रॅक्टर नदीपात्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 1:18 AM
वीरगाव : येथूनच जवळ असलेल्या कान्हेरी नदीच्या पुलावरून कांद्याने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह नदीपात्रात पलटी झाल्याने यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून, त्यास मालेगाव येथील खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले.
ठळक मुद्देदोघे गंभीर जखमी : वीरगाव येथील घटना