वणी : अतिमहत्त्वाचे असलेल्या ट्रामा केअर सेंटरचे काम दप्तर दिरंगाईने रखडले असून, हे काम पूर्ण होण्याची वाट पंचक्रोशीतील नागरिक पाहात आहेत. दिंडोरी, पेठ, कळवण, सुरगाणा, चांदवड या तालुक्यातील नागरिकांचा वणीच्या ग्रामीण रुग्णालयात नेहमीच राबता असतो. वणीपासून साधारणत: ३० ते ४० किमी अंतरावर ही गावे असून, आदिवासी उपयोजनेअंतर्गत आहेत.गुजरात राज्याच्या सीमेवर आणि सप्तशृंगीच्या पायथ्याशी वसलेले मध्यवर्ती व्यापारी पेठ असलेले वणी गाव राज्यमार्ग क्र. २३ वर आहे. येथून सप्तशृंगगड जवळच असल्याने भाविकांची या ठिकाणी सतत वर्दळ असते. पाच तालुक्याचा संपर्क वणी येथे असतो. या ठिकाणी ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय आहे; परंतु गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी नाशिकला हलविण्यात येते. अपुरे कर्मचारी आणि औषधसाठा यांचा ताळमेळ बसत नाही.वणीशी दळणवळणाचा संबंध येत असल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे सन. २००७ साली वणी परिसरात मोठा अपघात झाल्याने जीवितहानी झाली होती. त्या पार्श्वभूमीवर वणी येथे ट्रामा केअर सेंटरची मागणी जोर धरू लागल्याने सन २०११ साली निधी उपलब्ध होऊन दोन कोटीचे अंदाजपत्रक बनविण्यात आले. यात ३० बेड, दोन मोठे वार्ड, स्त्री व पुरु ष स्वतंत्र कक्ष, एक आयसीयू कक्ष, एक छोटे शस्त्रक्रियागृह, चार डॉक्टरांसाठी केबिन, सहा परिचारिकांसाठी सुश्रूषा केंद्र अद्यावयत शस्त्रक्रिया गृह, सीटी स्कॅन, डिजिटल एक्स-रे मशीन, दोन जनरल मेडिकल आॅफिसर, एक अस्थिव्यंग शल्य चिकित्सक, दोन भूलतज्ज्ञ, एक परिसेविका, तीन अधिपरिचारिका, एक वाहनचालक, चतुर्थश्रेणी सेवक तीन, सफाई कर्मचारी दोन अशी. टीम ट्रामा केअरसाठी लागणार आहे.ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीचे काम ऐंशी टक्के पूर्ण झाले असले तरी परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, इमारतीसमोर रुग्णांना बसण्यासाठी अगर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. क्ष किरण कक्ष छोटे असून, त्याचा दरवाजा अरुंद आहे, शस्त्रक्रिया विभागाच्या बाजूला हात धुण्यासाठी जागा नाही, एसी बसविण्यासाठी योग्य जागा नाही त्यामुळे इमारत ताब्यात घेणे हे सर्वतोपरी नियमांच्या बाहेर असल्याने उपविभागीय अभियंता सा.बां. उपविभाग दिंडोरी यांच्याकडून कुठलीही गुणवत्ता तपासणी अहवाल प्राप्त न झाल्याने इमारत ताब्यात घेऊ शकत नसल्याचे पत्र वैद्यकीय अधीक्षकांनी दिलेआहे. ट्रामा केअर सेंटर सुरू होण्याची मागणी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली होती. तांत्रिक बाबीमुळे ट्रॉमा केअर सेंटरची पूर्तता होणे प्रशासकीय स्तरावर अडचणीचे ठरू पाहत असल्याने १०० खाटांच्या रु ग्णालयाचा प्रारंभ या इमारतीत करण्याची मागणी पुढे आली आहे. कारण १६ प्रकारचे विविध आजारांचे तज्ज्ञ डॉक्टर यात कार्यान्वित होऊ शकतात तसेच अद्यावत रु ग्णसेवा उपलब्ध होऊ शकतात गंभीर आजाराच्या रु ग्णांना आदिवासी भागातील गरजूंना हे रु ग्णालय नवसंजीवनी ठरू शकल्यामुळे याचा पाठपुरावा करण्यासाठी आरोग्य मंत्र्याची भेट घेऊन १०० खाटांचे रु ग्णालय सुरू होणे अपेक्षित व गरजेचे आहे.
वणीचे ट्रामा केअर अडकले लाल फितीत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:54 AM
वणी : अतिमहत्त्वाचे असलेल्या ट्रामा केअर सेंटरचे काम दप्तर दिरंगाईने रखडले असून, हे काम पूर्ण होण्याची वाट पंचक्रोशीतील नागरिक पाहात आहेत. दिंडोरी, पेठ, कळवण, सुरगाणा, चांदवड या तालुक्यातील नागरिकांचा वणीच्या ग्रामीण रुग्णालयात नेहमीच राबता असतो. वणीपासून साधारणत: ३० ते ४० किमी अंतरावर ही गावे असून, आदिवासी उपयोजनेअंतर्गत आहेत.
ठळक मुद्दे काम रखडले : अपुऱ्या कर्मचाºयांमुळे परिसरातील रुग्णांचे हाल पाच तालुक्याचा संपर्क वणी येथे असतो.