शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

महाराष्ट चेंबर-मलेशिया असोसिएशनमध्ये व्यापार करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:22 AM

महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स आणि मलेशिया होलसेलर्स असोसिएशन यांच्यात व्यापारउद्योग संबंध वाढविणे व तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करण्यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला.

सातपूर : महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स आणि मलेशिया होलसेलर्स असोसिएशन यांच्यात व्यापारउद्योग संबंध वाढविणे व तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करण्यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व मलेशिया असोसिएशनचे अध्यक्ष डेटो-लिम सेंग कोक यांनी स्वाक्षऱ्या केल्या.आयमा सभागृहात महाराष्ट्र चेंबर आणि आयमा यांच्या संयुक्त विद्यमाने मलेशियामधील व्यवसाय संधींविषयी परिसंवाद आणि बी टू बी बैठक घेण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर कॉन्सुलेट जनरल आॅफ मलेशियाचे कौन्सुल जनरल झाइनल अझलन नादझीर, मलेशिया होलसेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष डेटो-लिम सेंग कोक, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, अनिलकुमार लोढा, आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, धनंजय बेळे, ललित बूब, जगदीश पाटील उपस्थित होते. यावेळी मंडलेचा यांनी सांगितले की, भारतातील निर्यात वाढावी आणि त्याद्वारे आर्थिक विकास व्हावा यासाठी विविध देशांच्या वकिलातीत संपर्क करून त्या त्या देशातील व्यापारी, उद्योजकांच्या भेटी आयोजित करत आहोत. महाराष्ट्र चेंबरचे प्रतिनिधीचे शिष्टमंडळ मलेशिया दौºयावर जाऊन आले त्याचाच भाग म्हणून मलेशियाचे शिष्टमंडळ नाशिकला आले आहे. मलेशिया असोसिएशनचे अध्यक्ष डेटो-लिम सेंग कोक यांनी सांगितले की, मलेशिया आणि भारत दोन्ही देशांतील व्यापारउद्योग वाढावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मलेशियामध्ये अन्न व पेयपदार्थ, पॅक फूड, गिफ्ट, स्मृतिचिन्हे, हस्तशिल्प, फॅशन अ‍ॅक्सेसरीज, होम डेकोर व किचनवेअर, हलाल उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, पीसी व मोबाइल अ‍ॅक्सेसरीज, संगणक, तयार कपडे व वस्त्र, फॅशन आणि क्रिएटिव्ह उत्पादने आदी क्षेत्रात मलेशियात व्यापार उद्योगांसाठी मोठ्या संधी आहे त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. कॉन्सुलेट जनरल आॅफ मलेशियाचे कौन्सुल जनरल झाइनल अझलन नादझीर यांनीही भारत व मलेशियातील व्यापारी संबंध अधिक दृढ होण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न होत असल्याचे सांगितले. यावेळी सुनीता फाल्गुने, भावेश मानेक, स्वप्नील जैन, सोनल दगडे, मिथिला कापडणीस, चिराग फाल्गुने, राजेंद्र वडनेरे, मिलिंद राजपूत, उन्मेष कुलकर्णी, राजेंद्र आहिरे, एस. एस. भोगल, दिलीप वाघ, योगीता आहेर, एन. टी. गाजरे, अविनाश मराठे, राजेंद्र कोठावदे आदींसह कार्यकारिणी सदस्य व व्यापारी, उद्योजक उपस्थित होते.

टॅग्स :businessव्यवसायNashikनाशिक