या वेळी सटाणा पालिकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी व्यापारी बांधवांशी चर्चा करत मागणी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे तत्काळ पोहोचविण्याचे आश्वासन दिले. नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्याशी चर्चेनंतर व्यावसायिकांनी तहसील कार्यालय गाठत तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनादेखील निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, सध्या कोरोना महामारीचे मोठे संकट उभे राहिले असले तरी प्रशासनाने आठवडे बाजार बंदचा निर्णय घेऊन छोट्या व्यावसायिकांच्या उदरभरणाचा प्रश्न निर्माण केला आहे. या वेळी राजाराम पवार, रमेश जगताप, श्रीपाद कायस्थ, नीलेश भामरे, कृष्णा जगताप, योगेश निकुंभ, राजेंद्र शिवदे, दीपक अमृतकार, सुरेश बाविस्कर, नितीन शिरोडे यांच्यासह व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इन्फो
फक्त व्यापारीच दोषी?
कोरोना संक्रमणासाठी फक्त आठवडे बाजार व्यापारीच दोषी आहेत का, असा सवाल या व्यावसायिकांनी केला आहे. प्रशासनाने खबरदारी घेऊन आठवडे बाजारास परवानगी द्यावी, सर्व व्यापारी प्रशासनास सहकार्य करतील, असेही निवेदनात म्हटले आहे.
फोटो- १२ सटाणा मोर्चा
आठवडे बाजार सुरू करण्यासंदर्भात नगराध्यक्ष सुनील मोरे यांना निवेदन देताना व्यावसायिक.
===Photopath===
120321\12nsk_35_12032021_13.jpg
===Caption===
फोटो- १२ सटाणा मोर्चा आठवडे बाजार सुरू करण्यासंदर्भात नगराध्यक्ष सुनील मोरे यांना निवेदन देताना व्यावसायिक.