पेठ : पेठ तालुक्यातील म्हसगण गावातील उच्च शिक्षित तरु ण मागील पाच वर्षांपासून एकत्र येऊन विविध आदिवासी सणांच्या सांस्कृतिक परंपरा स्वत: सहभागी होऊन जपत आहेत.होळीच्या सणानिमित्त कवी देवदत्त चौधरी, सुभाष खांबाईत, विकास खांबाईत, धनराज अलबाड, हंसराज , अलबाड , मोहन अलबाड, गिरीधर खांबाईत, दौलत खांबाईत, व गावातील लहान थोर मंडळी एकत्र येत व विविध आदिवासी वेशभूषा करत गावागावातून फिरून पेरणा, खटखुबा, सोंगे, नडगीचानाच, असे विविध कार्यक्र म ढोल व पावरीच्या सुरावर सादर केले.त्यावेळी बालकलाकार म्हणून राधेय चौधरी, कर्ण चौधरी अंकुश ,मयंक चौधरी, लखन सातपूते,महेश खांबाईत, दिनेश महाले, भूषण अल्बाड, तुषार टोपले, योगेश सातपुते, अजय डोळे, उमेश खांबाईत यांनी सुद्धा कार्यक्र मात सहभागी घेतला.
उच्च शिक्षित तरु ण जपताहेत होळीच्या पारंपारीक पध्दती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 5:38 PM