नाशिक: रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस पथक वाहनांची तपासणी करत असताना गुजरातकडे जाणाऱ्या अवजड ट्रेलरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात वाहतूक पोलिसाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. ३०) जिल्ह्यातील पेठ तालुक्यात घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर पेठ तालुक्यातील वांगणी गावाजवळ जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस पथक वाहनाची तपासणी करत होते. यावेळी पेठकडून वापीकडे जाणारा राजू रोडलाइन्स ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रेलर क्र. एम. एच. २३, एयू १४४१ ने रस्त्यावर उभे असलेले पोलीस नाईक कुमार गायकवाड यांना जोरदार धडक दिली. ट्रकच्या जोरदार धडकेने गायकवाड हे घटनास्थळी काही क्षणातच गतप्राण झाले. जिल्हा वाहतूक शाखेच्या वाहनाजवळ ते उभे असताना ही घटना घडली. या वेळी जिल्हा वाहतूक शाखेच्या एम. एच. १५, एफ. टी. २४१९ या वाहनात चालकासह ६ कर्मचारी होते. वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहने थांबवून तपासणी करण्यात येत असताना ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेचे वृत्त कळताच यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
वाहतूक शाखेच्या पोलिसास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 9:01 PM
नाशिक: रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस पथक वाहनांची तपासणी करत असताना गुजरातकडे जाणाऱ्या अवजड ट्रेलरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात वाहतूक पोलिसाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. ३०) जिल्ह्यातील पेठ तालुक्यात घडली.
ठळक मुद्देपेठ नजिक अपघात : अवजड ट्रेलरच्या धडकेने जागीच मृत्यू