अखेर द्वारका चौकात डांबरीकरणाचे काम
नाशिक : द्वारचा चौकाच्या चारही बाजूला निर्माण झालेले खड्डे अखेर डांबरीकरण करून बुजविण्यात आले आहेत. चौकातील वाहतूक बेटाभोवती संपूर्णपणे डांबरीकरण करण्यात आले आहे. यामुळे वाहतुकीचा होणारा खोळंबा थांबण्यासही मदत होणार आहे. सुरळीत वाहतुकीसाठी डांबरीकणाची मागणी होत होती.
दुचाकीवर नियमांचे सर्रास उल्लंघन
नाशिक: नववर्षाचा जल्लोष घरात राहून आणि नियम पाळून साजरा करावा, असे प्रशासनासह पोलिसांचे आदेश असताना सरत्या वर्षाच्या रात्रीला दुचाकीस्वार ट्रिपल सीट सुसाट वेगाने चालविल्या जात असल्याचे चित्र गंगापूर रोडला दिसून आले. गर्दी टाळण्याचे आवाहन करूनही दुचाकीस्वार टाळके पर्यटनाच्या ठिकाणीही हुल्लडबाजी करतांना आढळून आले. त्यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई होताना दिसली नाही.
भाजी, फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण
नाशिक: जेल रोड येथील फिलोमिना चर्चसमोरील रस्त्यावर फळ आणि भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. फिजिकल डिन्टन्सचा नियमाचे पालन न करता विक्रेत रत्यावर दुकाने थाटत आहेत. अनेकांनी तर चारचाकी वाहनतच दुकान थाटले आहे. या मार्गावर झाडांखाली दुकाने थाटत आहेत. गेल्या काही दिवसांपासून विक्रेत्यांच्या संख्येतही वाढ झाल्याने येथे ग्राहकांची गर्दीही वाढू लागली आहे.
स्वीटमार्टकडून नियमांचे उल्लंघन
नाशिक: मिठाईची मुदत संपुष्टात येत असल्याची तारीख असली पाहिजे, असा नियनम अन्न व औषध प्रशासनाने केलेला असतानाही मिठाई दुकानदारांकडून या नियमांचे पालन होतांना दिसत नाही. मिठाई वापराची तारीख पॅकिंगवर दिली जात नाही, तसेच दुकानांमधील मिठाई संदर्भात कुठेही उत्पादन आणि संपण्याची तारीख दिसत नाही.
वयोवृद्धांना शिवभोजन
मोफत देण्याची मागणी
नाशिक : राज्य शासनाने शिवभोजन योजना सुरू केली असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यानंतर दहा रुपयाला मिळणारी भोजन थाळी पाच रुपयाला करण्यात आली आहे. तरीही काही वयोवृद्ध केंद्रांपर्यंत पेाहोचू शकत नसल्याने, अशा ज्येष्ठांना शिवभोजन थाळी घेणे परवडत नाही. त्यामुळे त्यांना मोफत भोजन थाळी देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक संस्थांनी केली आहे.