पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गाचे सावळघाटात रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून, ठेकेदाराकडून वाहतुकीचे योग्य नियोजन न केल्याने वाहनांची कोंडी होताना दिसून येत आहे.नाशिक ते पेठ मार्गावर सावळघाटात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून, दोन्ही बाजूने वाहने एकाच वेळी समोरासमोर येत असल्याने वाहतुकीचा खोळंबा व कामामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. सध्या संचारबंदीमुळे वाहनांची तुरळक वर्दळ असली तरी अवजड वाहनांना एकेरी मार्गाने पुढे जाताना कसरत करावी लागत आहे.घाटाच्या एका बाजूला उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूने खोल दरी असल्याने पर्यायी मार्ग काढणे अवघड आहे. त्यामुळे ठेकेदाराने काम करत असताना वाहतुकीचे योग्य नियोजन करून दोन्ही बाजूने कर्मचारी नेमणूक करून एकेरी वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी वाहन चालक व प्रवाशांकडून करण्यात येत आहे.----------------------------------पेठ महामार्गावर सावळघाटात रस्त्याचे काम सुरू असल्याने नियोजनाअभावी वाहतूकीची कोंडी होत आहे. अवजड वाहने अडकून रस्ता बंद होण्याची शक्यता गृहीत धरून संबंधित ठेकेदार यांनी कामाबरोवर वाहतूक सुरळीत होण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे.- योगेश राऊत, प्रवासी, पेठ
सावळघाटात वाहतुकीचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 9:54 PM