लोकमत न्यूज नेटवर्कघोटी : इगतपुरी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी शहरातील वाहतुकीचा प्रश्न चांगलाच निर्माण झाला असून, नागरिकांना या कोंडीचा रोजच सामना करावा लागत असल्यामुळे नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न निर्माण केला आहे. दरम्यान, जिल्हा वाहतूक शाखेने घोटी शहरासाठी नेमलेले दोन्ही वाहतूक पोलीस वाहतूक कोंडीच्या वेळी गायब होत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी सक्षम पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.इगतपुरी तालुक्यातील प्रमुख व्यापारी बाजारपेठ असणाऱ्या घोटी बाजारपेठेतून जाणाऱ्या जुन्या महामार्गावर बाजार भरत असल्याने रस्त्यावर भरणाऱ्या या बाजारामुळे शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असते. तसेच शहरातील भंडारदरा चौक ते रेल्वे फाटकापर्यंत ही वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. दरम्यान शहराची ही वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यात यावी यासाठी सर्वच राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांनी सातत्याने पाठपुरावा करूनही वाहतूक पोलिसांनी दखल न घेतल्याने वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस घोटीकरांची डोकेदुखी ठरत आहे.
वाहतूक कोंडी कायम
By admin | Published: June 20, 2017 12:52 AM