नांदूरशिंगोटे : पुण्याकडून नाशिक जिल्ह्यात प्रवेश करणाºया वाहनांची सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील बायपास चेक पोस्टवर तपासणी करण्यात येत आहे. पुण्यातील होम कॉरण्टाइन रुग्ण बाहेर पडू नये यासाठी काळजी घेतली जात आहे. आरोग्य, महसूल, ग्रामपंचायत कर्मचारी पथक याठिकाणी कार्यान्वित आहे. परदेशातून आलेले, बाहेर जिल्ह्यातील प्रवासी यांची नोंद घेतली जात आहे. वावी पोलिसांचे पथक याठिकाणी कामात सहकार्य करीत आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रवेश करणाºया प्रत्येक वाहनाची तपासणी करून कोरोना संशयित आणि क्वॉरण्टाइन रुग्णांना रोखण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. सोमवारपासून (दि. २३) तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील बायपासजवळ सकाळी ९ वाजता पोलीस प्रशासनाच्या मदतीने वाहनांची तपासणी केली जात होती. आरोग्य विभाग, पंचायत समिती, महसूल विभाग, पोलीस अशा चार विभागाचे प्रत्येकी १ याप्रमाणे चार कर्मचाऱ्यांचे एक पथक तैनात करण्यात आले आहे. सदर पथक हे २४ तास कार्यान्वित राहणार असून, येणाºया जाणाºया वाहनांची तपासणी करणार आहेत. येणाºया वाहनातील प्रवाशांचे पथकामार्फत तपमान, ब्लडप्रेशर, प्लसरेट आदींची आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत चेक नाक्यावर ५५० वाहनांतून तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावेळी आरोग्य तपासणीही होत आहे.