--------------------------
सायनेतील सरस्वती विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा
मालेगाव : सायने येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. उद्घाटन राजेंद्र भोसले यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काळू सावंत होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक नंदकुमार सावंत उपस्थित होते. बक्षीस वितरण रमेश उचित, रविराज सोनार, विवेक पाटील आणि सुरेंद्र टिपरे यांच्या उपस्थितीत पार पडले. परीक्षक म्हणून दत्ता पाटील आणि योगिता पाटील उपस्थित हाेते. लहान गटात दसाने विद्यालयातील नव्या निवृत्ती पवार हिने प्रथम, विनय मंदिरच्या जितेंद्र पवार याने द्वितीय, ल. रा. काबरा विद्यालयाच्या अमृता शिवाजी उदीकर याने तृतीय क्रमांक पटकावला. मोठ्या गटात झोडगे जनता विद्यालयातील तृषा देसले हिने प्रथम, काबरा विद्यालयाच्या समीक्षा आहिरे हिने द्वितीय, तर सायने विद्यालयातील शुभम पाटील याने तृतीय क्रमांक पटकावला.
---------------------------------------------------------------------------------------------------------
आता पाचवीच्याही शाळा होणार सुरू
मालेगाव : तालुक्यात आता पाचवी ते सातवीच्या शाळा सुरू हेणार असल्याने पालकांचे लक्ष शाळांकडे लागले आहे. नववीचे वर्ग सुरळीत सुरू झाले असले तरी पाचवीचे विद्यार्थी त्या तुलनेत लहान असल्याने पालकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. एका बाकावर एकाच विद्यार्थ्याला बसविण्यात येणार आहे. आता शाळा सुरू झाल्यानंतर पालक आणि विद्यार्थी कसा प्रतिसाद देतात, याकडे शाळांचे लक्ष लागून राहिले आहे.
------------------------------------------------------------------------
मंत्र्यांच्या दरबारात कारभाऱ्यांची गर्दी
मालेगाव : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्यानंतर आता गावातील कारभारी आणि पॅनल प्रमुखांची राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयात वर्दळ वाढली असून, आता सरपंच पदाचे आरक्षण कसे निघते आणि कुणाला सरपंच पद द्यायचे, याबाबत व्यूहरचना आखणे सुरू आहे. सकाळी मंत्र्यांच्या दरबारात हजेरी लावून लवाजम्याची रोजची उठबस वाढली आहे. मंत्र्यांना कोरोना झाल्याने काही काळ संपर्क कायार्लय ओस पडले होते. भुसे कोरोनामुक्त झाल्याने त्यांचे संपर्क कायार्लय पुन्हा गर्दीने फुलू लागले आहे.