लासलगाव : येथील चांदवड-मनमाड मार्गावरील रेल्वे गेट नादुरुस्त झाल्याने सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीत सापडलेल्या प्रवाशांचे आतोनात हाल झाले. सोनी-सांगवी येथील शेतकरी शैलेश गंगाधर ठाकरे यांनी थेट रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे सोशल साइटचा वापर करून तक्रार केली. लासलगावहून चांदवड-मनमाडकडे जाणाºया रस्त्यावर रेल्वे गेट आहे. या मार्गावर वाहनांची गर्दी असते. रविवारी सकाळी १० वाजता बराच वेळ वाहतूक कोंडी झाली. दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुचाकीचालकांनी बारा बंगले परिसरातून शिवनदीच्या पुलाखालील छोट्या जागेतून मार्ग काढला. चारचाकीं वाहनांना कोटमगाव मार्गे वा वाकी मार्गे फेरा मारत वाट शोधावी लागली. वाहतूक कोंडीचा त्रास प्रवाशांसह इंधनाची वाहतूक करणाºया टँकर व माल वाहतूक करणाºया ट्रकचालकांना सहन करावा लागला. रेल्वे गेटचा अडसर टाळावा म्हणून टाकळी मार्गे मालधक्क्यापासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मात्र हे काम संथ गतीने सुरू आहे. या कामातील जमीन अधिग्रहणाचा प्रश्न जमिनीच्या भावावरून बºयाच कालावधीपासून भिजत पडला आहे. या प्रश्नी शासनदरबारी लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे.
लासलगाव येथील रेल्वे गेटवर वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:48 AM