सरपंचपद निवडीच्या हालचाली सुरू
नाशिक: तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींमधील महिला सरपंचपदाचे जाहहर झाल्यानंतर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. तालुक्यातील ३४ ठिकाणी महिला सरपंचपदाचे आरक्षण असून संवर्गनिहाय आरक्षण जाहीर झाल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानुसार राजकीय समीकरणे जुळविली जात आहेत.
ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून सहलींचे आयोजन
नाशिक: कोरोनापूर्वी आयोजित सहली कोराेनाच्या प्रभावामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. आता त्या सहलींचे पुन्हा आयोजन करण्यात आले आहे. शहरातील अनेक ठिकाणी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी फलक उभारून प्रवाशांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ज्यांची सहल मागीलवर्षी रद्द झाली त्यांच्या सहली पुन्हा आयोजित करण्यात आल्या आहेत.
लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
नाशिक: काेरोनामुळे बंद असलेला लोकशाही दिन येत्या सोमवारपासून सुरू केला जात आहे. नाशिरकोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी ११ वाजता लोकशाही दिन होणार आहे. समस्याग्रस्त पीडित महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकशाही दिनात प्रश्न उपस्थित करण्याची संधी महिलांना मिळणार असल्याने महिला व बालविकास विभागीय उपायुक्त सुरेखा पाटील यांनी कळविले आहे.