नाशिक : वाहतूक पोलिसांशी अरेरावी, उद्धट बोलणे, दमबाजी करण्यापर्यंत नव्हे तर मारहाणीच्या घडणाºया घटना आता थेट पोलिसांच्या वर्दीवर असलेल्या ‘वॉर्न कॅमेरा’ कैद करणार आहे. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पाच कॅ मेºयांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. लवकरच शंभर कॅ मेºयांचा पुरवठा होणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना रोखण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच मुंबई, पुण्याच्या धर्तीवर पोलीस महासंचालकांकडे आयुक्तालयाने ‘वॉर्न कॅमेरा’ पुरविण्याचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र अद्याप हा प्रस्ताव लालफितीतच अडकल्याचे वृत्त २० जुलै रोजी ‘लोकमत’ने प्रसिध्द क रून लक्ष वेधले होते. कारण १८ जुलै रोजी सीबीएससारख्या वर्दळीच्या व महत्त्वाच्या चौकात कर्तव्य बजावणाºया वाहतूक पोलिसासोबत वाद घालून एका महिलेने थेट श्रीमुखात भडकावल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर वाहतूक पोलिसांबरोबर काही बेजबाबदार वाहनचालकांकडून घातला जाणारा वाद आणि मारहाणीच्या घटनांचा प्रश्न चव्हाट्यावर आला होता. त्यामुळे पोलिसांना वॉर्न कॅमेरे तत्काळ पुरविणे गरजेचे असल्याचे मत सदर वृत्तामधून मांडण्यात आले होते. आधुनिकीकरणाकडे वाटचाल करणाºया शहर पोलीस दलामध्ये वॉर्न कॅमेºयांची भर पडली असून, हे शुभवर्तमान समजले जात आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वाहतूक पोलिसांना या कॅमेºयांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपआयुक्त डॉ. लक्ष्मीकांत पाटील आदी उपस्थित होते.
वाहतूक पोलिसांना मिळाले ‘वॉर्न कॅ मेरे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 9:52 PM