नाशिक : सरकारी नोकऱ्यांचे आमीष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्यांची काही कमी नाही; मात्र यामध्ये आता शहरातील एका वाहतुक पोलिसाचे नाव पुढे आल्याने संताप व्यक्त होत आहे. ईस्टर्न रेल्वेत नोकरीचे आमीष दाखवून संशयित वाहतुक पोलीस रमेश मोतीगीर गोसावी याने त्याच्या साथीदार संशयित सचीन भाऊसाहेब म्हस्केच्या मदतीने हनुमानवाडीतील एका रहिवाशाला तब्बल १८ लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, ईस्टर्न रेल्वेत नोकरीला लावून देतो असे सांगून टीसी पदाची गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नावाने बनावट ऑर्डर तयार करून संशयित गोसावी व म्हसके या जोडगोळीने दोघा सुशिक्षित बेरोजगारांना सुमारे १८ लाखांना ह्यचुनाह्ण लावल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी हनुमानवाडीत राहणाऱ्या बाबाजी रामजी केदारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या दोघा संशयितांविरुध्द पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संशयित आरोपी गोसावी व म्हस्के यांनी नोव्हेंबर २०१४ ते मे २०१६ या कालावधीत केदारे व त्यांचा नातेवाईक स्वप्निल महेंद्र बागुल यांना विश्वासात घेऊन त्यांना इस्टर्न रेल्वेत टीसी पदावर नोकरीला लावून देतो असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी १८ लाख रुपये घेऊन त्यांना गव्हर्न ऑफ इंडियाच्या नावाने ह्यटीसीह्णचे बनावट नियुक्तीपत्र दिले. ज्यावेळी फिर्यादी व त्याच्या नातेवाईकांनी चौकशी केली असता अशाप्रकारे कुठल्याही पदाची भरती सुरु नसल्याची त्यांची खात्री पटली आणि आपली लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ पंचवटी पोलिस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.
वाहतुक पोलिसाने सुशिक्षित बेरोजगाराला घातला १८ लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 5:14 PM
संशयित आरोपी गोसावी व म्हस्के यांनी नोव्हेंबर २०१४ ते मे २०१६ या कालावधीत केदारे व त्यांचा नातेवाईक स्वप्निल महेंद्र बागुल यांना विश्वासात घेऊन त्यांना इस्टर्न रेल्वेत टीसी पदावर नोकरीला लावून देतो असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी १८ लाख रुपये
ठळक मुद्दे रेल्वेत नोकरीचे आमीष'टीसी'पदाचे दिले बनावट नियुक्तीपत्र