शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

दुर्घटना टळली : नाशिक-पुणे महामार्गावर वाहतूक ठप्प; अन्य मार्गाने वाहतूक वळविली नाशिकरोडला गॅस टँकर उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:10 AM

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील बिटको महाविद्यालयानजीक गुरुद्वारासमोर स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने भरधाव वेगात जाणाऱ्या गॅसने भरलेल्या टॅँकरचालकाने जोºयात ब्रेक मारल्याने गुरुवारी पहाटे गॅस टॅँकर उलटला.

ठळक मुद्देसुदैवाने गॅस गळती न झाल्याने मोठी दुर्घटना टळली लोखंडी जाळ्या व पथदीपाचा खांबदेखील जमीनदोस्त

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील बिटको महाविद्यालयानजीक गुरुद्वारासमोर स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने भरधाव वेगात जाणाऱ्या गॅसने भरलेल्या टॅँकरचालकाने जोºयात ब्रेक मारल्याने गुरुवारी पहाटे गॅस टॅँकर उलटला. सुदैवाने गॅस गळती न झाल्याने मोठी दुर्घटना टळली. सदर टॅँकर क्रेनच्या साह्याने सरळ करण्यासाठी तीन तास लागले. यावेळी दत्तमंदिर सिग्नल ते उपनगर नाकापर्यंतची वाहतूक रोखून धरण्यात आली होती. दरम्यान, नाशिक-पुणे महामार्गावरील दोन्ही बाजंची वाहतूक अन्य मार्गांनी वळविण्यात आली होती.मुंबई येथून साडेसतरा टन एचपी कंपनीचा गॅस घेऊन सिन्नर माळेगाव एमआयडीसीमध्ये निघालेला टॅँकर (एनएल ०१ एए ४०४८) गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास द्वारका येथून नाशिक-पुणे महामार्गाने सिन्नरला जात होता. गुरूद्वारासमोर महामार्गावरील गतिरोधकावर टॅँकरच्या पुढे असलेला एक ट्रक हळू झाला. मात्र पाठीमागून भरधाव वेगात येणाºया गॅस टॅँकरचालकाला पुढील हळू झालेला ट्रक व गतिरोधकाचा अंदाज न आल्याने ब्रेक मारल्याने टॅँकरचालकाची कॅबिन फिरून दुभाजक व त्यामधील लोखंडी जाळ्यावर आदळून रस्त्यावर आली. तर पाठीमागील गॅसने भरलेला टॅँकर हा रस्त्यावर उलटला. कॅबिनच्या धडकेने दुभाजकामधील लोखंडी जाळ्या व पथदीपाचा खांबदेखील जमीनदोस्त झाला. टॅँकरमधून गॅस लिकेज न झाल्याने मोठी दुर्घटना टळली. प्रत्यक्षदर्शींनी गॅसचा टॅँकर उलटल्याची माहिती उपनगर पोलीस व शहर नियंत्रण कक्षाला देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी एचपी गॅस कंपनीच्या अधिकाºयांना सदर अपघाताची माहिती दिली, तर सुरक्षितेच्या कारणास्तव नाशिकरोड अग्निशामक दलाचा बंब पहाटे सहा वाजता घटनास्थळी दाखल झाला. दरम्यान एचपी गॅस कंपनीच्या सिन्नर माळेगाव प्लॅँट व्यवस्थापक एन. के.शुक्ला व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. दोन मोठ्या हायड्रोलिक क्रेन उलटलेला टॅँकर सरळ करण्यासाठी दाखल झाल्या. तेव्हापासून उपनगर नाका व दत्तमंदिर सिग्नल येथून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. टॅँकरच्या बाजूलाच महावितरणचा विद्युत वाहिन्या असलेला खांब होता. त्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठादेखील खंडित करण्यात आला होता. दोन्ही हायड्रोलिक क्रेनच्या साह्याने पूर्णपणे खबरदारी घेत गॅसने भरलेला टॅँकर अथक प्रयत्नानंतर सरळ करण्यात आला. त्यानंतर टॅँकरचे नवीन कॅबिन बोलवून ११ वाजेच्या सुमारास त्या कॅबिनला टॅँकर जोडून रस्त्यावरून हलविण्यात आला. तर अपघातग्रस्त टॅँकरचे कॅबिन रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत उभे करण्यात आले. तब्बल तीन तास महामार्गावरील उपनगर नाका ते दत्तमंदिर सिग्नल दरम्यानची वाहतूक रोखून धरण्यात आली होती. या अपघातामध्ये टॅँकर चालक मौला कासिम शेख (३४, रा. दरेगाव जि. लातुर) हा जखमी झाला आहे. शुक्ला यांच्या फिर्यादीवरून टॅँकरचालक मौला शेख यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाहतुकीची कोंडी वाहनधारकांचे प्रचंड हालपहाटे साडेपाच वाजता टॅँकर पलटी झाल्यानंतर नाशिकरोडकडून नाशिककडे जाणाºया रस्त्यावरून येणारी-जाणारी वाहतूक सुरू होती. यामुळे वाहतुकीची कोंडी होण्यास सुरूवात झाली. त्यामुळे पोलिसांनी नाशिककडून नाशिकरोडच्या दिशेने येणारी वाहने उपनगर, कॅनॉलरोड, जेलरोडमार्गे वळविली, तर नाशिकरोडकडून जाणारी वाहने बिटको, दत्तमंदिर सिग्नल चौकातून आर्टिलरी सेंटररोड, जयभवानी रोड तसेच विहितगाव वडनेरमार्गे वळविली जात होती. अवजड व बाहेरगावच्या वाहनधारकांना वळविलेल्या वाहतूक मार्गाची माहिती नसल्याने त्यांनी महामार्गावर कडेला आपली वाहने उभी केली होती. या अपघातामुळे पळसे-शिंदेपर्यंत वाहनांची रांग लागली होती. तर दुसरीकडे विजय-ममता सिग्नलपर्यंत वाहनांची रांग लागली होती. स्थानिक वाहनधारकांनी कॉलनी रस्त्यातून आपली वाहने मार्गस्थ करून घेतली.सुदैवाने मोठी दुर्घटना टळलीसाडेसतरा टन गॅस असलेला टॅँकर पलटी होऊन सुद्धा टाकीतून गॅस लिकेज न झाल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. अपघात स्थळापासून हाकेच्या अंतरावर लोकवस्ती होती. तर टॅँकर पलटी झालेल्या रस्त्याच्या कडेलाच महावितरणच्या विद्युत वाहिन्या असलेला लोखंडी खांब होता. त्या खांबाला टॅँकरचा धक्का लागला असता किंवा विद्युत वाहिन्या तुटल्या असत्या तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.विद्यार्थ्यांच्या वर्दळीमुळे खबरदारी घेण्याची गरजमहामार्गावर गुरूद्वारालगत जेडीसी बिटको इंग्लिश मिडियम स्कूल, बिटको महाविद्यालय, जयरामभाई हायस्कूल, के.जे.मेहता हायस्कूल, ई.वाय. फडोळ कनिष्ठ महाविद्यालय हे सर्व हाकेच्या अंतरावर आहे. या ठिकाणी सकाळपासून सायंकाळपर्यंत हजारो विद्यार्थी, पालक, विद्यार्थी वाहतूक करणारे वाहने यांची मोठी रेलचेल असते. तसेच परिसरात खाजगी क्लासेस, जलतरण तलावदेखील असल्याने विद्यार्थी, जलतरणपटू, रहिवासी यांची वर्दळ असते. नाशिक-पुणे महामार्गावर पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत सतत वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे गुरूद्वारा ते शिखरेवाडीपर्यंत दुभाजकांमध्ये शाळा, महाविद्यालय, विद्यार्थी यांची माहिती देणारे फलक लावणे गरजेचे आहे. स्पीड ब्रेकर, झेब्रा पट्टे मारणे, सर्वत्र रिफ्लेक्टर लावणे व गुरूद्वारा ते शिखरेवाडीपर्यंत वाहन वेग मर्यादा असा फलक लावणे गरजेचे आहे.