इंदिरानगर : यू-टर्न काम पूर्ण झाल्याने लोकार्पण सोहळ्यापूर्वीच वाहतूक सुरू झाली असून, जॉगिंग ट्रॅकसमोरील बोगद्यातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकसमोरील बोगद्यात होणारी वाहतूक कोंडी काढण्यासाठी पेठेनगरसमोर उड्डाणपुलाच्या खाली यू-टर्न मंजूर करूनही त्याचे काम सुरू करण्यास विलंब होत असल्याने वाहतुकीची कोंडी कायम आहे़ या कामाला विरोध हाणून पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्तात काम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. अखेर सुमारे सहा महिन्यांपूर्वी यू-टर्न काम सुरू करून ते पूर्ण झाल्याने निवडणुकीची आचारसंहिता असल्याने लोकार्पण पूर्वीच वाहनधारकांनी वाहतूक सुरू केली आहे.इंदिरानगर बोगद्यातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी अनेक वेळेस विविध उपाययोजना करण्यात आल्या, परंतु बोगद्यातील वाहतूक कोंडी कमी झाली नाही त्यात दिवस भर पडत आहे. त्यामुळे दिवसभरात अनेक वेळेस वाहनधारकांना वाहतूक कोंडी समोर जावे लागते. याची दखल घेत पेठेनगरसमोर सुमारे पावणेदोन वर्षांपूर्वीची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या यू-टर्नचे काम हाती घेतले होते. कामाची सुरुवात करण्यात आली होती. परंतु स्थानिक एका नगरसेवकांनी विरोध केल्याने काम थांबविण्यात आले होते. तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी पेठेनगरसमोरील यू-टर्न जागेची पाहणी करून तातडीने काम सुरू करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. सुमारे सहा महिने सदर काम पूर्ण करण्यात आले असून, वाहनधारकांनी वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे आता बोगद्यातील वाहतुकीची कोंडी कमी होती की नाही याकडे लक्ष लागून आहे.अपघातानंतर काम सुरूसुमारे पाच महिन्यांपूर्वी सुंदरबन कॉलनीकडून कमोदनगरकडे उड्डाणपूल ओलांडत असताना झालेल्या अपघातात मायलेकांनी जीव गमावला होता. यावेळी संतप्त महिला व नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन भुयारी मार्गाचे कामाचा शुभारंभ करण्यात आला होता.
वाहतुकीची कोंडी होईल सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:49 AM