सिडको : पाथर्डी फाटा ते अंबड गावाकडे जाणाऱ्या जंक्शनवर सायंकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, याच ठिकाणी दोन वाईन शॉप असल्याने आधीच दारू घेण्यासाठी नागरिकांनी रांगा लावलेल्या असल्याने या वाहतुकीत अधिकच भर पडली. त्यामुळे सुमारे एक तास वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र बघायला मिळाले.
पाथर्डी फाटा जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौफुलीवर नियमित गर्दीत असते. या चौफुलीवरून अंबड औद्योगिक वसाहतीकडे तसेच अंबड गावाकडे जाणाऱ्या वाहनधारकांची दररोज गर्दी होत असल्याने सकाळ व सायंकाळच्या सुमारास वाहतूक विस्कळीत होण्याचे तसेच ट्रॅफिक जाम होण्याचे प्रमाण कायमच आहे. त्यातच मंगळवारपासून वॉईन शॉप बंद होणार असल्याने सोमवारी सायंकाळी येथील वाईन शॉपवर मोठ्या प्रमाणात दारू घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याने त्यात अधिकच भर पडली. पाथर्डी फाटा चौफुलीवर कायमस्वरूपी ट्रॅफिक पोलीस व्यवस्था असणे गरजेचे असतानाही याबाबत मात्र प्रशासनाकडून लक्ष दिले जात नसल्याचे वाहनधारकांकडून बोलले जात आहे. पाथर्डी फाटा चौफुलीवर होत असलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे सर्वसामान्य नागरिकांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका व पोलिस प्रशासनाने याबाबत दखल घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी या चौफुलीची नियमावली करणे गरजेचे असल्याचेही नागरिकांमधून बोलले जात आहे.
इन्फो
दुकानदाराला दंड
पाथर्डी फाटा चौफुल्ली येथे सायंकाळी चारचाकी व दुचाकी वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या ठिकाणी अंबड पोलीस ठाणे येथील अधिकारी पोलीस गाडीतून उतरले. त्यांनी या ठिकाणी असलेली गर्दी नियंत्रणात आणण्याऐवजी या ठिकाणी असलेल्या दारू दुकानाबाहेर दारू घेण्यासाठी येणाऱ्यांनी सामाजिक अंतर न पाळल्याने दुकानदाराला पाच हजार रुपये दंड करण्यातच धन्यता मानली.
फोटो
०५अंबड