शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
2
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
5
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
6
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
7
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
8
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
9
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
10
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
11
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
12
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
13
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
14
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
17
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
18
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
20
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?

येवल्यात वाहतूक कोंडी

By admin | Published: February 09, 2017 12:18 AM

पोलिसांचे दुर्लक्ष : विंचूर चौफुलीवर सिग्नल यंत्रणेची गरज

येवला : स्वच्छ शहर, सुंदर शहर, येवला शहर ही संकल्पना कागदावरच राहिली आहे. पण वाहतूक कोंडीचे शहर म्हणून ओळख व्हायला सुरुवात झाली आहे. येथील नगर-मनमाड रस्त्यावर येवला-विंचूर चौफुलीसह फत्तेबुरुज नाका, गंगा दरवाजा भागात चौफुलीवर सध्या कायम वाहतूक कोंडी होत आहे.येथे अभावानेच पोलीस आढळतात. नगर-मनमाड राजमार्गावर येवला-विंचूर चौफुली या भागातून शहरात येण्यासाठी असलेला मार्ग सध्या सर्व्हे नंबर ३८०७ व ३९०९ या भागात गेल्या साडेतीन वर्षांपासून शॉपिंग सेंटरचे काम चालू असल्याने या भागातून शहराचा संपर्कअनेकदा बंद असतो. त्याला पर्यायी मार्ग म्हणून लक्कडकोट देवी मार्गापासून वाहतूक वळविण्यात आली आहे. येवला-विंचूर चौफुली भागातून नाशिक, नगर, औरंगाबाद, धुळे या चारही जिल्ह्यातील वाहने जात असतात. सध्या तर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. नगर व औरंगाबाद येथून नाशिकला जाणारी वाहने जाताना वाहनचालकांना शहरात लावलेल्या अभिनंदनाच्या फलकांचा अडथळा होत असल्याने नाशिक रस्त्याकडे कसे वळावे हेच समजत नाही. प्रवासी आणि माल वाहतूक करणाऱ्या गाड्या येथे उभ्या राहतात. अनेकदा मोठ्या गाड्यांना वळणदेखील घेता येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. शहरातील तीनही चौफुलींवर वाहतूक पोलीस २४ तास आवश्यक आहे. येथे पोलीस चौकी असून नसल्यासारखी आहे. येवला-विंचूर चौफुलीवर वाहनचालकांना खाली उतरून वाहतुकीचे नियमन करावे लागते. वास्तविक पाहता येवला-विंचूर चौफुलीवर वाहतूक सिग्नलची अत्यंत आवश्यकता आहे. चौफुलीवर मध्यभागी पोलिसांना वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शेड नाही. त्यामुळे पोलीसदेखील याठिकाणी वाहतूक नियमनासाठी उभे राहू शकत नाही. या साऱ्या वाहतुकीच्या कोंडीतून व अडथळ्यांमधून येवलेकरांची सुटका कोण करील? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहराबाहेरून बायपास काढण्याच्या हालचाली झाल्यात, परंतु येवल्यात अडथळा आणणारे कमी नाहीत. तांत्रिक मुद्दे उपस्थित करून एखादे काम कसे लांबणीवर टाकायचे याबाबत माहीर असणाऱ्या काही धुरिणांनी हे काम लांबवले आहे. केवळ रास्ता रोकोसाठी वापरल्या जाणाऱ्या येवला-विंचूर चौफुलीवर राजकीय धुरिणांनी लक्ष घालून वाहतूक सिग्नल द्यावेत. शहरातील येवला-मनमाड महामार्गावरून पारेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर सिग्नलची अत्यंत गरज आहे. गंगादरवाजा व फत्तेबुरुज नाका या भागात सुमारे १० ते १२ हजार शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी ये-जा करीत असतात. येथे वाहतूक नियमन करण्यासाठी पोलीस नसतात. अपुरा पोलीस कर्मचारी वर्ग यामुळे या भागात पोलीस नसतात अशी माहिती आहे. रोडरोमिओदेखील बेताल पद्धतीने गाडीचे हॉर्न वाजवत भरधाव चालवत असतात. (वार्ताहर)