सटाणा : बागलाण तालुक्यात चंदन तस्करांची टोळी पुन्हा सक्र ीय झाली आहे. तालुक्यातील नवे निरपूर येथील एका शेतातून सुमारे दोन लाख रु पये किमतीची चंदनाची चार झाडे तोडून चोरट्यांनी पोबारा केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी वनविभागाकडे तक्र ार दाखल केली आहे.नवे निरपुर येथील गोरख कचवे या शेतकऱ्याने दहा वर्षांपूर्वी अवर्षण व दुष्काळाचा सामना करत आपल्या अडीच एकर क्षेत्रामध्ये वन विभागाच्या मार्गदर्शनानुसार स्वेता जातीच्या तीनशे चंदनाच्या रोपांची लागवड केली होती. सध्या ही झाडे तोडणीयोग्य झाल्याने कचवे यांनी ही चंदनाची झाडे तोडून विक्र ीचा परवाना मिळावा यासाठी वनविभागाकडे परवानगी मागितली होती.मात्र सोमवारी (दि.१६) चंदन तस्करांनी त्यांच्या शेतातील दोन लाख रु पये किमतीची चंदनाची चार झाडे तोडली आणि पोबारा केला. याबाबत वनविभागाकडे तक्र ार दाखल केल्यानंतर कचवे हे पोलिस ठाण्यात गेले असता सटाणा पोलिसांनी तक्र ार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचे कचवे यांनी सांगितले.दरम्यान, गेल्या वर्षी देखील चंदन तस्करांच्या टोळीने कचवे यांच्या शेतातून एक फुट व्यासाचे चंदनाचे झाड कापुन नेले होते. त्यावेळी त्यांनी सटाणा पोलीस ठाणे आणि वनविभागाकडे तक्र ार दाखल केली होती. मात्र चंदन तस्करांचा ठावठिकाणा लावण्यात तपास यंत्रणेला अपयश आल
निरपूर येथे चंदनाच्या झाडांची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 8:51 PM
सटाणा : बागलाण तालुक्यात चंदन तस्करांची टोळी पुन्हा सक्र ीय झाली आहे. तालुक्यातील नवे निरपूर येथील एका शेतातून सुमारे दोन लाख रु पये किमतीची चंदनाची चार झाडे तोडून चोरट्यांनी पोबारा केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी वनविभागाकडे तक्र ार दाखल केली आहे.
ठळक मुद्देटोळी पुन्हा सक्र ीय : दोन लाखांची झाडे नेली तोडून