नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात विविध कारणांसाठी दाखल असलेल्या नवजात अर्भकांपैकी तब्बल ५५ अर्भकांचा एका महिन्यातच मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. इनक्युबेटरसह अन्य सुविधा अपुºया असल्याने हा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. महाराष्टÑाचे गोरखपूर ठरावे अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.मुळात अठरा ‘वॉर्मर’ठेवण्याची क्षमता असलेल्या विशेष नवजात शिशू दक्षता विभागात उपचारासाठी साडेतीनशे अर्भके आॅगस्टमध्ये दाखल झाली होती. त्यापैकी ५५ बालकांचा श्वास ‘व्हेंटिलेटर’अभावी थांबल्याचा प्रकार समोर आला आहे.नाशिकचे जिल्हा शासकीय रुग्णालय श्रेणी दोनमध्ये समाविष्ट असल्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या रुग्णालयात ‘टर्शरी केअर सेंटर’ नसल्यामुळे आॅक्सिजनची गरज भासणाºया नवजात शिशुंना व्हेंटिलेटरसह तज्ज्ञ डॉक्टरदेखील पुरविणे शक्य होत नाही. यामुळे अखेरच्या टप्प्यात धोक्याची पातळी ओलांडलेल्या गंभीर शिशुंचा आॅक्सिजनअभावी मृत्यू होत असल्याचे रुग्णालयाच्या प्रशासनाने क बूल केले. २९१ बालकांचा जीव वाचविण्यास प्रशासनाला यश आले असून, सध्या ५२ अर्भकांवर उपचार सुरू आहेत. सरकारी यंत्रणेने याबाबत हतबलता व्यक्त केली आहे. विशेष नवजात शिशू दक्षता विभागाच्या विस्तारासाठी मंजूर असलेल्या नूतन इमारतीकरिता शासनाने २१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध क रून दिला आहे; मात्र अद्याप जिल्हा रुग्णालयाच्या आवारात केवळ बोटावर मोजण्याइतक्या झाडांच्या अडथळ्यामुळे पाच मजली इमारतीच्या भूमिपूजनाला मुहूर्त लाभत नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले. महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीकडून गुलमोहरसारख्या पर्यावरणपूरक नसलेल्या वृक्षतोडीला परवानगी दिली जात नसल्यामुळे नवजात शिशू दक्षता विभागाच्या विस्तारासह त्या विभागातील ‘वॉर्मर’ची संख्या वाढविण्यास अडथळा येत असल्याचे जगदाळे म्हणाले. ‘इन्क्युबेटर’ कालबाह्य होऊन ‘वॉॅर्मर’ हे अपुºया वाढीचे जन्माला आलेल्या अद्ययावत वैद्यकीय आधुनिक यंत्र नवजात शिशुंसाठी उपलब्ध झाले आहे. अत्यवस्थ अर्भकांचे प्रमाण लक्षात घेता किमान ४४ वॉर्मर आणि प्रत्येकी ‘वार्मर’मागे एक अशा ४४ परिचारिकांची गरज आहे. निर्देशानुसार एका वॉर्मरवर एक अर्भक उपचारासाठी आवश्यक आहे; मात्र वॉर्मरची संख्या अपुरी आणि ते हाताळण्यासाठी मनुष्यबळही अपुरे असल्यामुळे सध्या रुग्णालयात १८ वॉर्मरवर विभागाची भिस्त अवलंबून आहे, सदर बाबीला व्यवस्थापनानेही दुजोरा दिला आहे. नवजात शिशु दक्षता विभागात एप्रिल महिन्यापासून आॅगस्ट अखेर दीड हजार नवजात शिशूंना दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान १८७ शिशूंना जीव गमवावा लागला. सर्वाधिक मृत्यू आॅगस्ट महिन्यात झाले.
महिनाभरातील धक्कादायक वास्तव : आॅक्सिजनचा तुटवडा, निधी मंजूर होऊनही मिळेना मुहूर्त जिल्हा रुग्णालयात ५५ अर्भकांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 1:10 AM